विमा पॉलिसी घेताय? फसवणुकीपासून सावध रहा !

 विमा पॉलिसी घेताय? फसवणुकीपासून सावध रहा ! 


फेसबुक लिंक https://bit.ly/3mDn4UG
  .         आपण घेतलेल्या विमा पॉलिसी अनेकदा त्याच्या नियम आणि अटी न वाचताच घेतो. तसेच त्यापासून मिळणारे फायदे, त्यासाठीचे नियम याची माहिती आपण घेतलेली नसते. आपला विश्वास असलेल्या कंपनीकडून जरी पॉलिसी घेत असलो तरीही काही गोष्टींचा काळजी घेतली पाहिजे. आपला ज्यांच्यावर जास्त विश्वास आहे अशा कंपन्यांच्या नावाखालीही फसवणूक होण्याची शक्यता असते.

विमा पॉलिसी घेताय? फसवणुकीपासून सावध रहा !


एलआयसीने आपल्या विमा धारकांना अशा प्रकारच्या फसवणुकी पासून वाचण्यासाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
पॉलिसी घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती यात दिली आहे.
सही करण्यापूर्वी सर्व नियम वाचा
एलआयसी एजंट असो किंवा दुसरे कोणी जोपर्यंत तुम्हाला विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती मिळत नाही आणि समजत नाही तोपर्यंत कागदपत्रांवर सह्या करु नका.

विमा पॉलिसीचे नियम आणि अटी समजून घ्या आणि त्यानंतरच कागदपत्रांवर सही करा.
मूळ कागदपत्रे देऊ नका
एलआयसी कोणाकडूनही मूळ कागदपत्रे मागून घेत नाही. तसे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत. जर तुमच्याकडे कोणी मूळ कागदपत्रांची मागणी करत असेल तर त्याला नकार द्या.
चेक कंपनीच्या नावानेच द्या
तुम्ही विमा पॉलिसी घेतल्यानंतर प्रीमियमसाठी चेक भरणार असाल तर विमा पॉलिसी ज्या कंपनीची आहे त्याच नावाने चेक काढा. त्याऐवजी दुसऱ्या नावाने चेक मागितला जात असेल तर सावध व्हा.
*विचारशंका असतील तर विचारा
विमा पॉलिसी संदर्भात तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर ते विचारा. जर एखाद्या पॉलिसीबद्दल काही गोष्टी समजल्या नसतील तर त्या समजून घेऊनच पुढे पाऊल टाका.
बाकी रक्कम भरण्यासाठी फोन आल्यास
पॉलिसीची शिल्लक रक्कम भरण्यासाठी कधीही फोन केला जात नाही. जर तुम्हाला फोन आला तर काळजी घ्या आणि त्याबाबतची तक्रारही दाखल करा.
▪आकर्षक ऑफर्स येत असतील तर सावधान
तुम्ही एलआयसीचे विमा पॉलिसी धारक असाल आणि तुम्हाला कंपनीच्या नावाने ऑफर्स येत असतील तर काळजी घ्या. तुम्ही त्या फोनची शहानिशा करा आणि त्यानंतरच ऑफर्सचा विचार करा.

┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম