६० राण्यांचा आदिवासी राजा,म्यानमार मध्ये जेवण करून भारतात झोपतो


६० राण्यांचा आदिवासी राजा,म्यानमार मध्ये जेवण करून भारतात झोपतो



फेसबुक लिंक https://bit.ly/2ZPAByT
नागालँड हे इशान्य भारतातील राज्य अनेक चित्रविचित्र कथांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. अर्थात इशान्येकडच्या अन्य राज्यांप्रमाणे यालाही निसर्गाचे वरदान आहे.

६० राण्यांचा आदिवासी राजा,म्यानमार मध्ये जेवण करून भारतात झोपतो
 आदिवासी जाती जमातींची वस्ती असलेल्या या राज्यात अलिकडेच पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. आपणही कधी या राज्यात गेलात तर तेथल्या राजाला भेटायचा प्रयत्न जरूर करा. पण जरा सांभाळून कारण ही जमात हेड हंटर्स म्हणून ओळखली जाते म्हणजे माणसे मारून त्यांची डोकी हे बरोबर नेतात. अर्थात ही प्रथा आता बंद पडली आहे पण येथील घरातून आजही खोपड्या बघायला मिळतात.

तर गोष्ट आहे ती इथल्या राजाची. लोंगवा गावातील कोन्याक जमातीचा हा राजा. त्याला साठ राण्या आहेत. या राजाचे जेवण असते म्यानमारमध्ये व झोपायला तो भारतात असतो. ऐकून नवल वाटतेय? त्यात कांही नवल नाही कारण या प्रदेशाचा अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे व बाकी भाग भारताच्या हद्दीत येतो. या राजाच्या घरातूनच म्यानमार भारत सीमा जाते. याच्या स्वयंपाक घराचा भाग येतो म्यानमारमध्ये व झोपायच्या खोल्या आहेत भारताच्या हद्दीत. राजा अंग नगोवांग असे त्याचे नांव आहे. लोंगवाबरोबरच आणखी ७५ छोटी गांवेही त्याच्या अखत्यारीत आहेत.♍
या राजाचा मुलगा म्यानमार लष्करात नोकरी करतो. या घरातील सर्वांना भारत व म्यानमार अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व दिले गेले आहे. त्यामुळे या दोन्ही देशात ते कोणत्याही कायदेशीर कागदपत्रां शिवाय येजा करू शकतात.♍या गावातील प्रत्‍येकाला भारत आणि म्यानमारचे दुहेरी नागरिकत्‍व मिळालेले आहे. त्‍यामुळे नागरिक विना व्हिसा-पासपोर्टचे भारत आणि म्‍यानमारमध्‍ये ये-जा करतात. हे गाव जिल्‍हा मुख्‍यालयापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. येथे आसम राइफल्सचे जवान तैनात आहेत.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম