या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं

 या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं 
-
🦀  ११ लाख रूपये लिटर  🦀
--------------------------------------------
प्रत्येक जीवाचं रक्त हे लाल असतं.पण एक असा खेकडा आहे की त्याचं रक्त निळ्या रंगाचे असते. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे या जीवाच्या एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.
निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. हा जीव पृथ्वीवर सधारण ४५ कोटी वर्षांपासून आहे. हॉर्स शू खेकडे प्रामुख्याने अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरांच्या किनाऱ्यावर आढळून येतात. मे ते जून ह्या प्रजननकाळात पौर्णिमेच्या रात्री भरतीच्या वेळेला ते किनाऱ्यावर दाखल होतात. वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच ह्या खेकड्यांचा फस्ता पडणाऱ्या पक्षांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते.
या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं

(प्रयोगशाळेत रक्त काढत असताना ) 
हॉर्स शू खेकड्याच्या अनोख्या निळ्या रक्ताचा वापर औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे जीवाणूरहित करण्यासाठी केला जातो. तसेच काही औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.लाखोंच्या संख्येने खेकडे पकडून प्रयोगशाळेत नेले जातात. तिथे ह्या खेकड्यांचा हृदयाला छोटेसे छिद्र पाडून त्यांच्या शरीरातील अंदाजे ३०% रक्त काचेच्या भांड्यात जमा केले जाते. नंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते. हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा वापर वैज्ञानिक १९७० पासून करत आहेत.

तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं.खेकड्याच्या शरीरातील रक्ताला निळा रंग त्यातील तांब्यामुळे मिळतो. मानवी शरीरात याप्रकारे लोह असतं. त्यामुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो. पण शास्त्रज्ञांचा यात इतका इंटरेस्ट असण्याचं कारण फक्त निळा रंग नाही.

तांब्याप्रमाणेच हॉर्सशू खेकड्यांच्या रक्तात एक विशिष्ट रसायन असतं. यामुळे आजूबाजूच्या बॅक्टेरियांना शोधण्यास मदत होते.
अत्यंत कमी प्रमाणात वापरुन सुद्धा हे बॅक्टेरियाची उपस्थिती शोधू शकतं. क्लोटिंग एजंट चाचणी करण्यासाठी वापरला जातो.सध्या जगात हॉर्सशू खेकड्यांच्या फक्त चार प्रजाती उरल्या आहेत.
वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने या सर्व प्रजाती सध्या धोक्यात आहेत.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম