तोच मनी आकांत…-- भुंकपाच्या आठवणी

  •   तोच मनी आकांत…-- भुंकपाच्या  आठवणी 

  ३० सप्टेंबर १९९३ भुंकप


    
.        दि. ३० सप्टेंबर २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/2EK7G7V
       

३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३. ५६ मिनिटांनी झालेल्या भूकंपात लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. सर्वस्व गमावलेल्या हजारो लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष २५ वर्षांतनंतरही संपलेला नाही. पोरकेपण वाट्याला आलेल्या गावकऱ्यांच्या व्यथा सुन्न करणाऱ्या आहेत. किल्लारी भूकंपाला २६ वर्षे पूर्ण झाली. नैसर्गिक हानीत सर्वस्व गमावलेल्या किल्लारीवासीयांचे डोळे भूकंपाच्या आठवणीने पाणावतात. पुन्हा एकदा आयुष्य उभे करताना प्रत्येकाला संघर्ष करावा लागला. आता आयुष्यात स्थैर्य आले असले तरी मनातील आकांत थांबत नाही.
नवीन घरांनी गावाचा चेहरा बदलला तरी भूकंपाच्या दु:खद आठवणी गावाच्या मनात खोलवर रुतून बसल्या आहेत. या कटू आठवणी किल्लारीच्या अंगाखांद्यावर २५ वर्षांनंतरही दिसतात. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे तीन वाजून ५६ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आठ हजार जीव मातीत कायमचे गाडले गेले.
६ हजार लोक जखमी झाले. ५२ गावं मोठ्या हादऱ्यांनी उद्ध्वस्त झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या दाट लोकसंख्येच्या किल्लारीकडे जगाचे लक्ष वेधले गेले. भूकंप झाल्यानंतर पुनर्वसनासाठी सामाजिक संस्था, केंद्र व राज्य सरकारने परिश्रमपूर्वक काम केले. लोकांना हक्काचे घर मिळाले. या २५ वर्षांत लोक सावरले. पण, दिवसभरात एकदा तरी मनात भूकंपाची पडझड सुरू असते. आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दुर्घटनेचे स्मरण लोकांच्या जगण्याचा नित्याचा भाग झाले आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या दुर्घटनेत हजारो मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा पेच होता. बहुतेकांना मोठा खड्डा खोदून एकत्र पुरण्यात आले. ज्यांना शक्य होते त्यांनी अंत्यसंस्कार केले. भूकंपाच्या तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला. मातीखाली गाडले गेलेले मृतदेह, जनावरे पाण्याने फुगून वर येऊ लागली. सर्वत्र चिखल आणि मदतकार्यासाठी झालेली गर्दी. परिस्थिती बिकट झाल्याने नागरिकांना पत्र्याच्या शेडमध्ये निवारा करण्यात आला. भूकंपानंतरची दोन वर्षे म्हणजे फक्त जगण्याचा संघर्ष होता. सर्वस्व गमावलेल्या लोकांना आधार उरला नव्हता.
बालपणी अनाथपण वाट्याला आलेली पिढी तरुण झाली. सेवाभावी संस्थांच्या शाळा-महाविद्यालयात शिकून स्वत:च्या पायावर उभी राहत आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करुन कुटुंबं सावरली आहेत. सर्वस्व गमावलेला भूतकाळ विसरू पाहत आहेत. भूकंपाची आठवणी काढल्यानंतर काही जण बोलून मोकळे होतात. काही जण शून्यात नजर ठेवून मनात बोलत राहतात. २६ वर्षांनंतरही मनात आकांत कायम आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম