ख्रिस्ती बांधवही करतात पितरांचे स्मरण !

 ख्रिस्ती बांधवही करतात पितरांचे स्मरण ! 


.     माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव


.        दि.३० सप्टेंबर २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/3cLJEWA


ख्रिस्ती बांधवही करतात पितरांचे स्मरण !

        पितरांचे स्मरण करण्याची प्रथा केवळ हिंदू धर्मियांतच आहे, असे नव्हेतर ख्रिस्ती बांधव देखील त्यांच्या पितरांचे दरवर्षी स्मरण करतात. आपल्याकडे पितृपक्ष पंधरा दिवसांचा असतो, तर ख्रिस्ती बांधवांचा तीन दिवसांचा त्यालाच ‘हॅलोवीन’ म्हटले जाते. 31 ऑक्टोबरला होणार्‍या या सणाच्या स्वागतासाठी  तेथील बाजारपेठा आतापासूनच सजू लागल्या आहेत.
ख्रिस्ती बांधवांसाठी हॅलोविन डे म्हणजे जल्लोषाचा, आनंदाचा आणि चॉकलेटचाही दिवस असतो.
काही जण काळ्या कपडयातील भयानक मास्क लावलेल्या भुतांना दाराला लटकवतात. काहींच्या चेहर्‍यावर भीतीदायक मास्क काळे कपडे, तर काही जण चित्रविचित्र कपड्यात चेहरा रंगवून शहरात फिरतात.
 भारतातही साजरा होतो ‘हॅलोवीन’
‘हॅलोवीन डे’ अर्थात भुताटकीच्या या दिवसाने  सद्या जगभरात धुमाकूळ घातला असून, भारतातही त्याचे पेव वाढले आहे.मुंबईत तर ‘हॅलोविन’ निमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जाउ लागले आहे. यात बॉलीवूडमधील सेलिब्रेटींपासून मुंबई पोलिसही सहभागी होउ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी ‘हॅलोविन डे’च्या शुभेच्छा देत नागरीकांना नियम पाळण्याचे आवाहन करत जनजागृतीही केली होती.
भोपळ्याचे महत्त्व
हॅलोविन आणि भोपळा यांचे समीकरण रुढ झाले आहे. भोपळा वरच्या भागात कापून त्यातला गर बाहेर काढला जातो. त्यावर डोळे, नाक, तोंड कोरून त्यात पेटती मेणबत्ती ठेवतात. रात्रीच्या अंधारात, त्या मेणबत्तीच्या प्रकाशात हे चेहरा कोरलेले भोपळे गूढ पण आकर्षक वाटतात. त्यालाच ‘जॅक-ओ-लॅन्टर्न’ म्हटले जाते. आर्यलडमध्ये सुरू झालेली प्रथा हल्ली जगभर सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম