वडिलांनी बांधलेल्या घरात मुलाला नसतो हिस्सा, जाणून घ्या कायदेशीर अधिकार

वडिलांनी बांधलेल्या घरात मुलाला नसतो हिस्सा, जाणून घ्या कायदेशीर अधिकार   


.        दि. १४ सप्टेंबर  २०१८

फेसबुक लिंक https://bit.ly/2DWYCw6
  .         मुलगा-सून किंवा मुलगी-जावई आपल्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगत, जन्मदात्यालाच घरातून बेदखल करण्याच्या अनेक घटना समाजात घडतात. ज्याने लहानाचे मोठे केले त्या जन्मदात्यालाच बेवारस होण्याची वेळ ओढवते. तथापि, प्रॉपर्टीसंबंधित कायद्यांबद्दल अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. वेळोवेळी कोर्ट असे निर्णय देते, जे जाणून घेऊन तुम्ही संभ्रम दूर करू शकता. आज आम्ही अशाच एका निर्णयाबाबत माहिती देत आहोत, जो दिल्ली हायकोर्टाने वडिलांच्या संपत्तीबद्दल सुनावला होता. अशी कोणतीही संपत्ती जी वडिलांनी स्वत: निर्माण केली आहे, त्यावर मुलगी वा मुलाला कायदेशीर हक्क नसतो. हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, अशावेळी मुलांना फक्त वडिलांच्या दयेवरच राहू शकतात. वडिलांच्या इच्छेशिवाय कोणीही संपत्तीवर दावा करू शकत नाही.


🏡पैतृक संपत्तीवर मुलांचा हक्क असतो. पैतृक संपत्ती अशी संपत्ती असते जी पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. अशा संपत्तीत मुलगा वा मुलगी आपला हक्क सांगू शकतात, परंतु जर वडिलांनी स्वत: एखादी संपत्ती निर्माण केलेली आहे,

वडिलांनी बांधलेल्या घरात मुलाला नसतो हिस्सा, जाणून घ्या कायदेशीर अधिकार
तर मुलाला अथवा मुलीला द्यायची की नाही याचा निर्णय पूर्णपणे वडिलांवर अवलंबून असतो. जर वडिलांनी आपली संपत्ती कुणाच्याच नावे केली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर अशा केसमध्ये वारसदारांमध्ये संपत्तीचे वाटप केले जाते. यात मुलगा असो वा मुलगी दोघांनाही संपत्तीमध्ये समान हक्क असतो._*
🏡कुणाच्याही नावे करू शकतात संपत्ती..
अशा केसमध्ये वडील आपली संपत्ती कुणाच्याही नावे करू शकतात. हिंदू उत्तराधिकार अधिनियमाअंतर्गत वडील आपल्या संपत्तीचे ज्याप्रकारे वाटप करतात, त्याच प्रकारे संपत्ती वारसदारांमध्ये वाटली जाते. या प्रकारच्या एका खटल्यात दिल्ली हायकोर्टाने पालकांच्या बाजून निर्णय दिला आहे. मुलाने वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगितला होता. हायकोर्टाने तो फेटाळला आणि वडिलांच्या बाजूने निर्णय दिला होता.
पैतृक संपत्तीवर मुलांचा हक्क असतो. पैतृक संपत्ती अशी संपत्ती असते जी पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. अशा संपत्तीत मुलगा वा मुलगी आपला हक्क सांगू शकतात, परंतु जर वडिलांनी स्वत: एखादी संपत्ती निर्माण केलेली आहे, तर मुलाला अथवा मुलीला द्यायची की नाही याचा निर्णय पूर्णपणे वडिलांवर अवलंबून असतो. जर वडिलांनी आपली संपत्ती कुणाच्याच नावे केली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर अशा केसमध्ये वारसदारांमध्ये संपत्तीचे वाटप केले जाते. यात मुलगा असो वा मुलगी दोघांनाही संपत्तीमध्ये समान हक्क असतो. ____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম