मोटारसायकल 🏍 चालविताना सारखा ब्रेकवर पाय ठेवल्यास होते नुकसान

 मोटारसायकल  चालविताना सारखा ब्रेकवर पाय ठेवल्यास होते नुकसान    


.       दि. १४  सप्टेंबर  २०१८

फेसबुक लिंक https://bit.ly/3hsVB4z
बाईक चालवत असताना आपल्या चुकीमुळेच अपघात होईल असे नाही. तर इतरांच्या चुकीमुळेही आपल्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जीवाशी खेळ तडजोड करु नका.
आपण चालवत असलेल्या बाईकच्या वेगाबाबत एक मर्यादा ठरलेली असते. त्यानुसार बाईक चालवायला हवी. आपल्या गाडीच्या मर्यादेपलिकडे जाणे टाळावे. गाडी शांतपणे चालवावी. विनाकारण वेगाने चालविणे टाळावे.

मोटारसायकल  चालविताना सारखा ब्रेकवर पाय ठेवल्यास होते नुकसान

🏍 मोटारसायकल चालविताना आपण बऱ्याच चुका करतो. यातील एक चुकी म्हणजे, ब्रेकवर सारखा पाय ठेवणे. यामुळे काय होते? ब्रेक खराब होतात किंवा ब्रेक लागणे कमी होते. ब्रेक खराब झाल्यानंतर अचानक कोणीतरी आडवे आल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

🏍काही जण बाईक चालविताना ब्रेकवर हलकासा पाय ठेवतात. हा दाब जास्त नसला तरीही त्यामुळे ब्रेक पॅड आणि लायनर घासल्याने ते खराब होऊ लागतात. ही चूक बरेचजण करतात. ऐनवेळी वेगात असताना किंवा समोर एखादे वाहन, लहान मूल आल्यास जोरात ब्रेक दाबला जातो. मात्र, गाडीचे वजन, बाईकस्वाराचे वजन आणि वेग यामुळे बाईकचा ब्रेक वेळेवर लागत नाही. यामुळे अपघात होतो.
.🏍तसेच ब्रेकवर पाय ठेवल्याने ब्रेक पॅड गरम होतात. यामुळे त्यांची ग्रीपही निघून जाते. बाईक चालविताना ब्रेक दाबून राहतो. यामुळे ब्रेक त्याच पोझिशनमध्ये अडकल्यास ऐनवेळी ब्रेक दाबला जात नाही.हे टाळण्यासाठी ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी तो ब्रेक फुटरेस्टवर ठेवावा. तसेच तळव्याची दिशा थोडी बाहेरच्या बाजुने ठेवावी, म्हणजे ब्रेकवर पाय राहणार नाही

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম