वजन कमी करण्यासाठी उपवास करू नका

 वजन कमी करण्यासाठी  उपवास करू नका


.         दि. १४  सप्टेंबर २०२० 

फेसबुक लिंक https://bit.ly/2RrAKni
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असाल तर आपल्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. व्यायम आणि डाएट सोबतच जर आपण इंटरमिटेंट फास्टिंगवर फोकस केलं तर आपलं वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं.

वजन कमी करण्यासाठी  उपवास करू नका

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे जेवणाचं एकप्रकारचं चक्र ठरवतं. यात जेवण आणि उपवास यांच्यातील अंतर महत्त्वाचं ठरतं. म्हणजे जेवण आणि उपवास यांच्यामधील अंतर किती मोठं आणि लहान ठेवावं हे आपल्याला ठरवावं लागतं.
        वजन कमी  करण्यासाठी महिला सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यासाठी डायटींगपासून अगदी उपाशी  राहण्यापर्यंत सर्व काही करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही अशाप्रकारे उपवास करत असाल, तर तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपवासाचा पर्याय अवलंबणार असाल, तर त्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा  नक्की सल्ला घ्या.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणार असाल, तर त्याचा उलट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. उपाशी राहण्याचा सर्वात मोठा फटका शरीरातील मेटाबॉलिजमवर पडतो.

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापूर्वी तुम्ही योग्य तो आहार निवडावा. जर तुम्ही आहारात फळ, भाजी, बिया, टोफू, मासे, गव्हाचा ब्रेड याचा समावेश करावा. यातील कोणताही आहार तुम्हाला कठीण वाटतं असल्यास तुम्ही न्यूट्रिशनची मदत घ्या.
जर तुम्ही उपवास करणार असाल, तर तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावं लागतं. दिवसभर उपाशी राहिल्याने डोकं दुखणे, जळजळणे यासारखे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. उपाशी राहिल्याने तुमचा मू़डही बऱ्याचदा खराब होतो. तसेच शरीराला मिळाणारी पोषक तत्त्वे कमी प्रमाणात मिळाल्याने तुमच्या कामावरही त्याचा परिणाम जाणवतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आपल्या शरीरात 20 टक्के पाणी हे खाद्यपदार्थांद्वारे पोहोचते. याचाच अर्थ, जर तुम्ही दिवसभर काहीही न खाण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते. तोंड सुकणे, लघवी कमी होणे, पिवळ्या रंगाची लघवी होणे, स्नायू दुखणे यासारखी अनेक लक्षण दिसतात.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম