रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?

 रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ? 

रेल्वे मार्ग म्हटल्याबरोबर आपणासमोर रेल्वे रूळ व त्याखाली खडी असे चित्र उभे राहते., रेल्वेच्या गाडीचे वजन ट्रॅकवर तोलले जाते. साहजिकच यासाठी रेल्वेचा रुळ मजबूत असणे गरजेचा असतो. रुळांची दुरुस्ती, देखभाल सातत्याने करत राहावी लागते. जेव्हा रेल्वे धावत असते. तेव्हा जमीन आणि रेल्वे रुळांमध्ये कंपन निर्माण होते. उष्ण तापमानात रूळ प्रसरण पावतात. आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. वातावरणातील बदलांमुळे रेल्वे रूळांच्या आसपास रानटी गवत उगवते.
रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?
या सर्व गोष्टींना उपाय म्हणून रेल्वे रुळांमध्ये दगडी खडी टाकली जाते. जेव्हा ट्रेन रुळावर धावते तेव्हा ट्रॅकमध्ये कंपन तयार होतात आणि यामुळे ट्रॅक पसरण्याची शक्यता वाढते. ही दगडी खडी लाकडाच्या पट्ट्यांना जखडून ठेवते आणि लाकडाच्या पट्ट्या रूळाला जखडून ठेवतात…!  तसेच हवामान बदलण्याच्या वेळीही ट्रॅक पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे कंपन कमी करण्यासाठी रुळांच्या कडेला दगडी खडी ठेवण्यात येते. त्यामुळे ट्रॅकच्या आसपास गवत किंवा झाडे लावली जात नाहीत. छोट्या दगडांना (एकत्रितपणे) तांत्रिक भाषेत ट्रॅक ब्लास्ट असे संबोण्यात येते. हे मूलतः ट्रॅकबेड (एक प्रकारची खडीची गादी) तयार करते ज्याच्यावर स्लीपर ठेवलेले असतात.
ट्रॅकखाली लाकडी प्लेट(आता काही ठिकाणी लोखंडी किंवा सिमेंट प्लेट असतात.)ठेवण्याचे दुसरे कारण असे आहे की जेव्हा ट्रेन फिरते तेव्हा संपूर्ण भार ट्रॅक ऐवजी लाकडावर पडतो आणि आजूबाजूच्या दगडांमुळे, त्यास बरेच बळ मिळते जेणेकरून ते घसरत नाही.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম