गुलछडी : सुषमा शिरोमणी

गुलछडी : सुषमा शिरोमणी 

दि १४ सप्टेंबर २०२०
१९८० च्या दशकातील चित्रपट रसिकांना नक्कीच मोसंबी-नारंगी,फटाकडी,गुलछडी हे चित्रपट आठवत असतील.१९७६ ते १९८६ या दहा वर्षांच्या काळात सुषमा शिरोमणी यांनी चित्रपटांची निर्मिती केली असली तरी त्यानंतरही अनेक वर्षे त्यांच्या चित्रपटांची आणि त्यातील भूमिकांची जादू ग्रामीण महाराष्ट्रावर टिकून होती.
भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी या नावांवरूनच लक्षात येते की, त्यांचे सगळे चित्रपट स्त्रीप्रधान होते आणि विशेष म्हणजे या सगळ्या भूमिका पडद्यावर त्यांनी स्वत: साकारल्या होत्या.

गुलछडी : सुषमा शिरोमणी


मराठी पडद्यावर सासुरवाशिणीची प्रतिमा एकीकडे लोकप्रिय असताना दुसरीकडे सुषमा शिरोमणी यांच्या डॅशिंग भूमिकाही प्रेक्षकांना विशेष प्रिय होत्या. खेडोपाडी यात्रा-जत्रांच्या तंबूमध्ये तसेच टुरिंग टॉकिजमध्ये त्यांच्या हाणामारीच्या दृश्यांवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा. आयटम साँग ही संकल्पना मराठी चित्रपटांमध्ये मराठमोळ्या ढंगात त्यांनीच लोकप्रिय केली.लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा’ यामध्ये रेखाची दिलखेचक अदा मराठीमध्ये पाहायला मिळाली. त्यांच्या ‘भिंगरी’ चित्रपटातील गाण्यावर अरूणा इराणी, ‘फटाकडी’ चित्रपटात रेखा, ‘मोसंबी नारिंगी’मध्ये जितेंद्र, ‘गुलछडी’ मध्ये रती अग्निहोत्री आणि ‘ भानू’मध्ये मौसमी चटर्जी अशा कलाकारांनी नृत्य केले होते.
त्यांनी बालकलाकार म्हणून १९५८ साली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘लाजवंती’, ‘सोने की चिडियॉं’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केल्या. तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास पाहता त्यांची तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त वाटचाल आहे. तेवढाच त्यांचा चौफेर अनुभव आहे. ‘सतीचं वाण’ (१९६९) या चित्रपटात सहनायिका साकारत प्रौढ वयातील त्यांची वाटचाल सुरू झाली. 
गुलछडी : सुषमा शिरोमणी

त्यानंतर त्यांनी ‘दाम करी काम’ (१९७१) या चित्रपटात काम केले. राम डवरी यांच्या ‘रंगू बाजारला जाते’ या चित्रपटात त्यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजा परांजपे यांच्या ‘गुरुकिल्ली’ (१९६६) या चित्रपटात सुषमा शिरोमणी यांनी बहारदार नृत्य केले होते. त्यानंतर सुषमा शिरोमणी यांनी स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केली. भन्नाट भानू’ (१९८२) या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन करायलाही सुरुवात केली. नृत्य, संगीत. विनोद, साहस, अन्यायाचा प्रतिकार, दीनदुबळ्यांचे संरक्षण या विषयांचे चित्रण त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केले. द्य्वर्थी विनोदाचा आधार न घेता त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयाचे एक अंग म्हणजे त्यांनी केलेली साहसदृश्य हे होय.
अभिनयाबरोबरच निर्मिती, दिग्दर्शन, कथालेखन अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर त्यांनी काम केले.
ग्रामीण भागात त्यांचे चित्रपट खुपच चालत असत.त्या काळात तमासगीर स्त्री, पाटलाच्या वाडय़ातील डोक्यावर पदर घेतलेली, दाराआड सतत उभी राहणारी स्त्री मला भावली नाही. म्हणून नायिका फक्त मुळूमुळू रडणारी नसते तर धाडसी, साहसी, बिनधास्त हाणामाऱया करणारी तरीही आतून स्त्री-हृदयाची कोमल असू शकते हे दाखवून दिलं.

पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे असे भन्नाट रूप दाखवणारे हे चित्रपटही समाजानं स्वीकारले आणि एक नवा प्रवाह मराठी चित्रपटात १०७०-८० च्या दशकात आला.यामुळे सर्व चित्रपट सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली हिट ठरले.दादा कोंके नंतर रसिकांची पसंती त्यांच्या चित्रपटाना असायची.त्यांनीं ‘प्यार का कर्ज’या हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली होती.तसेच हिंदी चित्रपट निर्मिती संस्था ‘इम्पा’ या संघटेनेच्या अध्यक्ष पदही भुषविले आहे.आता सुषमा शिरोमणी चित्रपटापासुन दुर असुन निव्रुत जिवन जगत आहेत.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম