वाईन शॉप चा परवाना कसा काढावा?

 वाईन शॉप चा परवाना कसा काढावा ? 

फेसबुक लिंकhttps://bit.ly/35surIJ
वाईन शॉपसाठी परवाना मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज करणे आवश्यक असते हेच डिपार्टमेंट अर्ज पडताळणी करून वाईन शॉप,देशी दारूचे परवाने देते.

वाईन शॉप चा परवाना कसा काढावा ?
खाली वाईन शॉप काढण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सांगितली आहे:
🔸 हे परवाने चार प्रकारात आहेत. 

१) एफ. एल.- विदेशी मद्य,

२) एफ. एल/बीआर (बिअर) – म्हणजे विदेशी मद्य बिअर.

३) नमुना ई-२ म्हणजे फक्त वाईनसाठीचा परवाना.

४) सी. एल. -  देशी दारुचा परवाना.

______________________

हे चार मुळ परवाने आहेत. 

१) F. L. - विदेशी मद्य-(foren liquor) 

 परत यामध्ये आणखी चार प्रकार आहेत. 

2)F. L. 2- म्हणजे विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याचा परवाना. १९७३ पासून हा परवाना देणे शासनाने बंद केले आहे.

3) F. L. 3-  या प्रकारात हॉटेल मध्ये बिअर व भारतीय बनावटीचे विदेशी ब्रॅन्डचे मद्य व  विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्यासाठीचा असलेला  परवाना.म्हणजे हॉटेल आणि बार हे एकत्रित असतात तेथे हा परवाना चालतो.

4) F. L. 4 - परमिट रूम- येथे  भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य, विदेशी मद्य  विक्री करण्यासाठीचा परवाना. 

__________________

 F. L./ BR 2 - यामध्ये सिलबंद बिअर बाटली विक्रीचा परवाना. 

नमुना इ - म्हणजे वाईन व बिअर याची हॉटेल, कॅन्टिन मध्ये विक्री करण्याचा परवाना. 

नमुना इ २ - परमिट रूम, हॉटेल, कॅन्टिन येथे वाईनची किरकोळ विक्री करण्याचा परवाना. 

___________________

देशी दारू- परवाना C. L. 3 - देशीदारूची किरकोळ विक्री करण्याचा परवाना.पण शासनाने या परवान्यावर बंदी घातली असल्याने नविन परवाना मिळत नाही.मात्र हा परवाना मुळ मालकाच्या नावाने स्थलांतर करता येतो.यामध्ये पण अटी आहेत. 

 C. L. /F.L. / TOD2- म्हणजे देशी दारू ची किरकोळ विक्री करण्याचा परवाना. 

____________________

हे परवाने सध्या online process आहेत.यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची लिंक  https://exciseservices.mahaonline.gov असुन येथे जाऊन सबमिट करावे लागते.यासाठी मतदान आोळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन आॅनलाइन अपलोड करावी लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना साठी वेगवेगळी कागदपत्रे असतात. 

____

कागदपत्रे व प्रकार

१) F. L. साठी- बॅक हमीपत्र, आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र, हॉटेल लायसन,आयकर- विक्रीकर प्रमाणपत्र, अन्न व औषध प्रशासनाचं लायसन्स,आधारकार्ड,परमिट रूमचे लायसन. 

२) बिअर व वाईनसाठी-

बॅक हमीपत्र, आयकर- विक्रिकर प्रमाणपत्र,जिल्हा समितीची शिफारस,आधारकार्ड.

३) देशीदारू साठी - आधारकार्ड,आयकर- विक्रिकर प्रमाणपत्र,नगरपालिका किंवा ग्रामपंचायत परवाना, बॅक हमीपत्र. 

_______________

हि सर्व प्रोसेस केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होते.ही छाननी करणाऱ्या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक सदस्य सचिव असतातअसतात त्यांचेसमोर अर्जाची पडताळणी होऊन परवाना देण्याचा निर्णय होतो. 

_________

या सर्व परवान्यासाठी वेगवेगळी शुल्क आहे. ते लाखात असते.शिवाय दरवर्षी बदलत असते यासाठी परवाना देणारा भाग कोणता आहे (ग्रामपंचायत की नगरपालिका), तेथील लोकसंख्या किती आहे यावर शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे शुल्क आकारणी असते. हा व्यवसाय फायद्याचा असला तरी याची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे. 

- माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

सर्वांकडे परवाने होऊ नये यासाठी एक अलिखित प्रथा सिस्टिम मध्ये पडली आहे. या प्रथेला आपण लाच म्हणून ओळखतो. म्हणूनच भरमसाठ लाच देऊन लायसन्स मिळवणारे उदाहरणे आपल्याला दिसतात. परिणामी नुसता अर्ज करून परवाना मिळणे जवळपास अशक्यप्राय आहे.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬     


वाईन शॉप चा परवाना कसा काढावा ?

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম