कलावंती दुर्ग – मृत्यूचा किल्ला

 कलावंती दुर्ग – मृत्यूचा किल्ला 


फेसबुक लिंक https://bit.ly/3i2CiPK
माथेरान व पनवेलच्या मध्यावर असलेला हा गड म्हणजे २३०० फूट उंचीचा सरळसोट पहाड आहे.उंच शिखर आहे.हे शिखर कलावंतीनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून  ओळखले जाते हे एक लोकप्रिय दुर्गारोहण करण्यासाठी स्थान आहे. दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरासारखा किल्ला आहे. आजपर्यंत या किल्ल्यावर  गेलेल्या अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे.यामुळे तो धोकादायक म्हणून ओळखला जातो. गडावर जाण्याचा रस्ता खडतर व  अतिदुर्गम आहे यामुळे येथे जाणार्या पर्यटकांना सूर्यास्त होण्यापूर्वी परतावेच लागते. कारण वर वीज, पाणी अशी कोणतीही सोयीसुविधा नाही.

कलावंती दुर्ग – मृत्यूचा किल्ला
पहाडाची खडी चढाई पार करण्यासाठी खडकात कोरलेला पायर्या आहेत मात्र धरण्यासाठी रेलिंग अथवा दोर्या नाहीत. त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली अ्थवा पाय घसरला तर खालच्या खोल दरीतच माणूस गेलाच म्हणून समजा. या गडावर झालेले बहुतेक मृत्यू असेच झाले आहेत.♍ आसपासच्या स्थानिकांच्या मते या गडाच्या आसपास आजही मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे आत्मे वावरतात.असा समज आहे. 
स्थानिक कथेनुसार पूर्वी कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला.असे म्हटले जाते. पण  सध्या कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच राहिलेले नाही.या गडाचे मुळचे नांव  मुरंजन गड असे होते पण  शिवाजी राजांनी या गडाचे नांव बदलून ते कलावंती गड ठेवले असे सांगितले जाते. गडाच्या सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.यामुळे दमणवुक होते. म्हणुन उन्हाळ्यात जाणे टाळावे.या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील  असणाऱ्या आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते तयार झाले आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नुर्त्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
जावे कसे:: गडावर पोहचायचे कसे..
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे जुन्या नॅशनल हायवेवर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कलंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे जुना हायवे जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. शिवाय पनवेल वरुण (गांधी हॉस्पिटल) जवळ सहा आसनी मिनीडोर (टमटम) रिक्षा भाड्याने करुन ठाकुरवाडी गावामध्ये उतरावे
 या किल्लयावर गेल्यानंतर मुंबईचा कांही भाग व आसपासचे कांही किल्ले स्पष्ट दिसतात. उत्साही लोकांना या गडावर जाण्यासाठी मे ते आक्टोबर हा काळ चांगला आहे. पावसाळ्यात मात्र ही वाट न तुडविलेलीच बरी.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव ☎9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম