या देशांमध्ये आहेत लग्नाचे जगावेगळे नियम!

या देशांमध्ये आहेत लग्नाचे जगावेगळे नियम!


फेसबुक लिंक https://bit.ly/3i9iABU
लग्न करताय… पण तुम्हाला माहित आहे का लग्न करताना तुम्ही कोणाशी लग्न करताय या बरोबरच ते लग्न कुठे करताय याकडेही लक्ष द्यावं लागतं. लग्नाला ही काही नियम असतात हे माहितीए का तुम्हाला? जसा देश तसा वेश असं म्हणतो.

या देशांमध्ये आहेत लग्नाचे जगावेगळे नियम!
तसंच प्रत्येक देशाचे लग्नासंबंधीचे स्वतःचे असे काही नियम आहेत ते वाचाल तर म्हणाल गड्या अपुला देश बरा…
🔰सऊदी अरबः
सऊदी अरबमधले पुरूष पाकिस्तान, बांग्लादेश, चाड किंवा म्यानमार मधल्या महिलेशी विवाह करू शकत नाहीत.
🔰अमेरिकाः
लग्नासाठी काय लागतं असं विचारलं तर उत्तर सोपं आहे. मुलगा आणि मुलगी. पण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, कॉलराडो आणि मॉन्टानामध्ये जर दोघांपैकी एक व्यक्ती सैन्यात असेल तर एकाचा अनुपस्थितही लग्न होऊ शकतं. लग्नाच्यावेळी दोघांपैकी एक व्यक्ती उपस्थित असली तरी चालते. ते लग्न मान्य केलं जातं. मग, आहे ना नवल…
🔰जपानः
जपानमध्ये मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाच्या प्रेयसीला कायदेशीररित्या लग्नाची मागणी घालू शकतो.
🔰फ्रान्सः
लग्न दोन जीवांचा मेळ असतो असं म्हणतात. पण, फान्समध्ये मेलेल्या माणसाशीही लग्न करता येते. विश्वास बसत नाहीए ना? पण हे खरंय. एखादी व्यक्ती मरण पावली आहे पण त्या व्यक्तीशी लग्न करण्याची जर कोणाची इच्छा असेल तर ती व्यक्ती मृत माणसाशी लग्न करू शकते.
🔰मोनॅकोः
आपल्याकडे पळून जाऊन लग्न करण्याचा तर ट्रेण्डच आहे. पण मोनॅकोमध्ये लपून केलेलं लग्न मान्य केलं जात नाही. जोवर तुम्ही सार्वजनिकरित्या तुमच्या लग्नाची घोषणा करत नाहीत तोवर त्या लग्नाला मान्यता मिळत नाही.
🔰ग्रीसः
लग्न ठरल्यानंतर पत्रिका छापणं हा तर आपल्या आवडीचाच विषय. पण ग्रीसच्या यूनानमध्ये शहरी प्रशासनाच्या दरवाजावर दोघांची नावं लिहून तो कागद चिकटवायचा. जर तो कागद १० दिवस तसाच राहीला तर लग्न झालं. बास..
🔰इंग्लंड आणि वेल्सः
समुद्र किनारी मोकळ्या आभाळाखाली लग्न करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण नेमकी हीच गोष्ट इंग्लंड आणि वेल्समध्ये मान्य नाही. कोणाचंही लग्न एका इमारतीमध्ये एका छताखालीच होऊ शकतं. उघड्यावर केलेल्या लग्नाला इथे मान्यता नाही.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव ☎@9890875498   

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম