वाळणकोंडीची देवी वरदायनी आणि रहस्यमय देवमासे

🅰️ वाळणकोंडीची देवी वरदायनी आणि रहस्यमय देवमासे🅰️
_______________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________

फेसबुक लिंक https://bit.ly/339sBe2
🐋महाड बिरवाडीपासून 25 कि.मी.च्या अंतरावर असलेले वाळण हे ठिकाण रायगडच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे; परंतु आडमार्गाला असल्यामुळे ते दुर्लक्षित राहिले आहे. या ठिकाणी नदीपात्रातील खडकांमध्ये वरदायनी देवीचे जागृत देवस्थान असून येथे सात आसरा असल्याचे संबोधले जाते. नदीपात्रात असलेले वरदायनी देवी मातेचे मंदिर पाहण्यास मिळते.

वरदायनी देवीचे मंदिर तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्याचे कारण असे की, पावसाळी चार महिन्यांमध्ये हे मंदिर आणि आसपासचा संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. वरदायनी देवी फक्त हिवाळयात आणि उन्हाळयात दर्शन देते. येथे मंदिरालगतच नदीत मोठे कुंड असून त्या कुंडाच्या खोलीबाबत मोठे रहस्य आहे आणि येथे रहस्यमय देवमासे वास्तव्य करतात. हे देवमासे माता वरदायनी मातेची लेकरे असल्याचे मंदिरातील पुजारी सांगतात. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन लगेचच शेजारील कुंडामध्ये या देवमाशांना - म्हणजेच या देवी वरदायनी मातेच्या लेकरांना खाऊ घालून पर्यटक व देवीचे भक्त आपल्या मनातील आशा-आकांक्षा बोलून दाखवतात. देवमाशांना खाऊ घालणे हे पुण्यकार्य मानले जाते आणि त्यामुळे पर्यटकांच्या आणि भक्तांच्या आशा-आकांक्षा पूर्णत्वास जातात, असे म्हटले जाते. एकदा येथे आलेले पर्यटक परत दुसऱ्यांदाही येथे जरूर येतातच येतात.♍माहिती सेवा गृप पेठवड़गाव♍🐋🐋देवमासे हे वाळणकोंडीचे मुख्य आकर्षण आहेत. एकदा या देवमाशांना खाऊ घातले की लगेच थोडया वेळात आणखी मोठया आकाराचे देवमासे येतात. अशा प्रकारे सात मोठया आकाराचे देवमासे येथे पाहण्यास मिळतात. असे म्हटले जाते की, शेवटचा सातवा आकाराचा देवमासा पाहण्याची हिंमत माणूस करू शकत नाही. मी पाहिलेला शेवटचा मोठा देवमासा जवळजवळ चार फूट लांबीचा असावा. मी गोळा केलेल्या माहितीप्रमाणे हे देवमासे हिमालयात आढळणाऱ्या दुर्मीळ गोल्डन माहसीर माशांच्या प्रजातीचे आहेत. ही माहसीर माशांची प्रजाती येथे काळ नदीमध्ये कशी आढळते आणि तेदेखील फक्त देवी वरदायनी मातेच्या मंदिरालगतच्या कुंडातच, हे एक गूढ आहे. माशांची ही प्रजाती संपूर्ण नदीच्या 124 कि.मी.च्या पात्रात दुसरीकडे कोठेही सापडल्याची
नोंद नाही. हिवाळयात आणि उन्हाळयातच हे मासे येथे दिसतात आणि पर्यटकांनी आणि देवीच्या भक्तांनी दिलेल्या लाह्या, तांदूळ आणि इतर प्रसाद खातात. आश्चर्याची आणखी एक गोष्ट अशी आहे की, हे मासे श्रीफळ-नारळदेखील खातात. पर्यटकांनी फोडून खाऊ घातलेले श्रीफळाचे - खोबऱ्याचे तुकडे खाण्यासाठी देवमासे तुटून पडतात, पण ते फक्त हिवाळयात आणि उन्हाळयातच. पावसाळयाच्या सुरुवातीसच हे देवमासे येथून गायब होतात. पावसाच्या संपूर्ण कालखंडात देवमासे कुठे जातात याबद्दल कोणालाच काही ठाऊक नसते; पण एकदा पावसाळा संपला की देवमासे कुंडामध्ये पुन्हा मोठया प्रमाणात दिसू लागतात. कित्येक वर्षांपासून असे कालचक्र सुरूच आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारची दोनच ठिकाणे असल्याची माहिती आहे. एक कर्नाटक राज्यात आणि दुसरे महाराष्ट्रात. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील वाळणकोंडी हे देशाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे ठिकाण आहे. वाळणकोंडी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी आणि रहस्यमय देवमाशांना पाहण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी या निसर्गरम्य ठिकाणी अवश्य भेट द्यावी.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव ☎@9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম