उत्तर प्रदेशात बनतेय 'रावण मंदिर' 🅰️

उत्तर प्रदेशात बनतेय 'रावण मंदिर' 


रावणाचे मंदिर भारतात कोठेही नाही. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करत आसुरी शक्तींवर विजय मिळवला असला तरी आता रावणाचेही मंदिर भारतात बनत आहे.
उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील बिसरख हा गाव रावणाचे आजोळ असल्याने या गावात रावणाचे मंदिर बांधण्याची तयारी करण्यात येत आहे.
कौशिकेश्वर ज्योर्तिलिंग रावण मंदिर समितीने हे मंदिर उभारण्याचा संकल्प केला असून, भारतातले रावणाचे हे पहिले मंदिर असणार आहे.

उत्तर प्रदेशात बनतेय 'रावण मंदिर'

बिसरख गावात विश्रवा ऋषींचा आश्रम होता, त्यांचा विवाह भारद्वाज ऋषींच्या मुलीशी करण्यात आला होता. त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना रावण, कुंभकर्ण बिभीषण आणि सुर्पणखा ही चार मुले झाली.विश्रवा ऋषींनी गावातील दुधेश्वर मंदिरात कठोर पत करत अनेक देवांना प्रसन्न केल्याची आख्यायिका असल्याने या गावात रावणाचे मंदिर बांधण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिली.♍

रावण शिवोपासक होता. त्याचा या गावात जन्म झाला, म्हणून या गावात त्याचे मंदिर बांधण्यात येत असून, या मंदिरात भव्य शिवलिंग स्थापन करण्यात येणार असून, मंदिरात रावणाची विशालकाय मूर्तीही स्थापण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जयपूरमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
*माहिती सेवा गृप पेठवड़गाव* ☎9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম