सर्कससिंह परशुराम माळी

 सर्कससिंह परशुराम माळी 

लोकमान्य टिळकांनी ज्याचा सिंह म्हणून गौरव केला अशा माणसाची गोष्ट !!!
फेसबुक लिंकhttps://bit.ly/3i10nr5
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी सर्कस चालू केली. अवघ्या विसाव्या वर्षी त्याच्याकडे पाचशे लोकं कामाला होते. विसाव्या शतकाच्या सुरवातीलाच सातासमुद्रापार झेंडा रोवणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्कसपुत्राची हि कहाणी !!!
भारतात सर्कशीची परंपरा १८७९ पासून सुरू झाली. यादरम्यान भारतात अनेक सर्कशी स्थापन झाल्या. अशा अनेक सर्कशींपैकीच एक म्हणजे “परशुराम लायन्स सर्कस”.
या जगविख्यात सर्कसीचे मालक होते. सर्कससिंह परशुराम माऴी !!!
‘परशुराम लायन सर्कस’ ही परशुराम माळी यांनी १८९०च्या सुमारास सांगली जिल्ह्यातल्या तासगावला सुरू केली. लोकमान्य टिळकांनी परशुराम माळी यांना ‘द लायन ऑफ द सर्कसेस’ ही मानाची पदवी दिली आणि त्यावरून त्यांच्या सर्कसला हे नाव पडलं. त्यांच्या सर्कसमध्ये वाघ, सिंह, हत्ती, घोडे इत्यादी जनावरांचा मोठा भरणा होता.
परशुराम माळी या अवघ्या १८ वर्षाचा असताना त्यांनी त्यांच्या राहत्या घरावर कर्ज काढून सर्कस चालू केली. बघता बघता सर्कस नावारुपास आली आणि सर्कस सातासमुद्रापार गेली. ब्रम्हदेश, श्रीलंका, युरोप सारख्या भागात सर्कसीचे शो होवू लागले. त्या वेळी भारतीय सर्कसमध्ये जंगली प्राण्याचे खेळ होत नसत. ब्रम्हदेशाच्या दौऱ्यावर असताना परशुराम माळी यांनी नेमकी ही बाब हेरली आणि त्यांनी आपल्या सर्कसीत वाघ आणि सिंहाचे खेळ दाखवण्यास सुरवात केली. काहीतरी थरारक कराव म्हणुन ते आपला हात वाघाच्या जबड्यात देवू लागले. त्यांचे हे जीवावर उदार होवून केले जाणारे खेळ पाहून त्यांना लोकमान्य टिळकांनी “सर्कससिंह” नावाचा किताब दिला.
घरात येत होते पोत्यातून पैसे…
परशुराम माळी यांची किर्ती जगभर पसरू लागली. त्यांना सर्कसीतून इतकं उत्पन्न मिळू लागलं की ब्रिटीश काळात त्यांच्या घरात पोत्यातून पैसै येत. या पैशातून त्यांनी सर्कस वाढवली, जोपासली. आजूबाजूच्या लोकांना मदत करत त्यांना व्यवसायात आणलं. यातूनच तासगाव शहर सर्कस क्षेत्रासाठी नाव कमावू लागलं. एकट्या तासगाव शहरातून १५ ते २० सर्कसींची स्थापना होवून गावानं वेगळ्या पद्धतीने नावलौकिक मिळवला.
परशुराम माळी हे मोठ्ठे उद्दोजक म्हणून नावारुपाला येत असतानाच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. सर्कसीचा पसरलेला मोठ्ठा व्याप माळी कुटूंबाने काही दिवस कसाबसा पेलला. मात्र परशुराम लायन सर्कस अखेर १९५५ ला मिरज येथे बंद पडली.

सर्कससिंह परशुराम माळी

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম