कोकणचा खवळे महागणपती

कोकणचा खवळे महागणपती


 या गणपतीसमोर चक्क पिंडदान होते 
________________________

फेसबुक लिंक https://bit.ly/2FqKPhB
कोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तेभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण कोकणचा प्रांत हा विविधतेने नटलेला असून त्याला समृद्ध कला, साहित्य व संस्कृतीचे अधिष्ठान लाभले आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती समजला जाणारा गणपती कोकणातील घरोघरी मूर्तीच्या स्वरूपात आणून पूजला जातो. अपवाद फक्त मालवण बांदिवडे येथील कोईल गाव! तेथे घरात मूर्ती निषिद्ध असल्याने फक्त देवळातील मूर्तीची पूजा होते.
अशा विविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक ‘गाबीत मुमरी’ अर्थात ‘तारामुंबरी’ गावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली तीनशेपंधरा वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. सदर गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारात होता. त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती. ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत. तरणाबांड शिवतांडेलच्या लग्नाला सात वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. त्यामुळे तो काहीसा चिंताग्रस्त असायचा. अचानक एके दिवशी झोपेत त्याला मालडी (मालवण) या मूळ गावातील नारायण मंदिरातील गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे १७०१मध्ये त्या गणपतीची रीतसर स्थापना करण्यात आली. त्याचे फळ म्हणून त्याला पुत्ररत्न झाल्याने बालकाचे नाव गणोजी ठेवले. पुढे, १७५६ मध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर लढाईत शिवतांडेल यांना अटक झाली व नंतर त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी तारामुंबरीत खवळे यांच्या शेतात आहे. तेथे दर सोमवारी दिवा व अगरबत्ती लावली जाते. आज त्यांची दहावी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात आणि त्याला जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करताना दिसतात.
त्या महागणपतीचे वैशिष्ट्यही नाविन्यपूर्ण! जगात कोठेही न आढळणारे असे काहीसे दिसून येते. तो गणपती अन्य कारागिरांकडून न बनवता स्वत: खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात. सध्या ते काम भाऊ खवळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू चंद्रकांत व सूर्यकांत, कोणताही साचा न वापरता बनवतात. तशी प्रथाच पूर्वापार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. सुमारे दीड टन माती त्यांच्याच शेतजमिनीतून आणली जाते. नारळी पौर्णिमेला सुवर्ण नारळ सागराला अर्पण केल्यानंतर मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो. तर शेजारच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहाला सुरुवात होते. मूर्ती बैठी व पावणे सहा फूट उंचीची असते. दरवर्षी कोणताही बदल न करता एकच आकार, तेच रूप व रंग आणि उंची असते. गणेशचतुर्थीला गणपतीबाप्पाच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगवले जातात. त्याच स्वरूपात त्याची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा होते. तर दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लावतात. त्यावेळी नैवेद्य म्हणून खीर दाखवल्यावर ती शेतातही समाधीस्थळाजवळ ठेवली जाते.
तिसऱ्या दिवशी पुन्हा रंगकामाला सुरुवात होते. तर पाचव्या दिवशी संपूर्ण रंगकाम पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी रंगाचा अंगरखा, पीतांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय मूर्ती साकारली जाते. नंतर सातव्या, अकराव्या, पंधराव्या, सतराव्या व एकविसाव्या दिवसांपर्यंत सतत रंगकाम सुरूच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे ठिपके दिले जातात. त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्र रूप धारण केल्याप्रमाणे दिसतो. अशा प्रकारे एकवीस दिवसांत विविध रूपे साकारणारा असा तो एकमेव गणपती असावा. पहिले पाच दिवस दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला गणपतीची दृष्ट काढली जाते! हे एक विशेषच म्हणावे लागेल.
या गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्य्रांच्या आरमारात होता. त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती. ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत. शिवतांडेल तरणाबांड असून लग्नाला सात वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. त्यामुळे काहीसा चिंताग्रस्त असायचा. अचानक एके दिवशी तो झोपेत असताना मालडी (मालवण) या मूळ गावातील नारायण मंदिरातल्या गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा दिली.
त्याप्रमाणे १७०१ मध्ये या गणपतीची रितसर स्थापना करण्यात आली. त्याचे फळ म्हणून त्यांना पुत्ररत्न झाल्याने त्याचे नाव गणोजी असे ठेवले. 

कोकणचा खवळे महागणपती

पुढे १९५६ मध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर लढाईत शिवतांडेल यांना अटक झाली व नंतर त्यांचे निधन झाले. आजही त्यांची समाधानी तारामुंबरीत खवळ्यांच्या शेतात आहे. तेथे दर सोमवारी दिवा व अगरबत्ती लावली जाते. आज त्यांची १०वी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना त्याला जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करताना दिसतात.
अलिकडे भाविकांची गर्दी वाढू लागल्याने तो उत्सव एकवीस दिवस अधिकाधिक जल्लोषात साजरा करण्यात येतो. दर्शनासाठी भाविकां प्रमाणेच राजकारणी व सेलिब्रिटींची उपस्थितीही लक्षणीय होत आहे. त्या दिवसांत सर्वांचे आदरातिथ्य करण्यात खवळे बंधू कमालीचे व्यस्त असतात.♍
त्या उत्सवाची ‘लिम्का बुक’मध्ये चार वर्षांपूर्वीच नोंद झाली असून ‘गिनीज बुक’मध्ये नोंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी प्रसार माध्यमांची वानवा असल्याने व त्या घराण्याला प्रसिद्धीचा हव्यास नसल्याने सदर गणपतीला प्रसिद्धीचे वलय लाभले नव्हते. परंतु अलिकडे मात्र त्याची ख्याती वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून सर्वदूर पोचल्याचे आढळते.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম