दाढीवाली महिला गिनीज बुकात

दाढीवाली महिला गिनीज बुकात

फेसबुक लिंक https://bit.ly/3bK7CkK
लंडन : एखाद्या महिलेला दाढी असनं हा विषय एक तर चेष्टेचा आथवा मानसीक त्रासाचा समजला जाईल. पण इंग्लंडमधील एका महिलेच्या बाबतीत हा किस्सा अभिमानाचा ठरला आहे. कमी वयात दाढी असणारी पहिला महिला म्हणून हरनाम कोर हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या घटनेनंतर आता हरनाम अत्यंत अनंदीत झाली असून तिला या गोष्टीचा अभिमान आहे.
याबाबत ती म्हणते की, गालावरील दाढीमुळे अनेक वेळा लोक माझी चेष्टा करत होते. पण मी हार मानली नाही. कॅटऑक मॉडेल आणि बॉडी इमेज एक्टिविस्ट म्हणून आपण काम केले. त्यामुळे या गोष्टीचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.♍
हरनामचे वय २४ वर्षे २८२ दिवस आहे. गिनीज बुकने बुधवारी तिची नोंद केल्याची घोषणा केली आहे. हरनामला पोलिसिस्टि ओवरी सिंड्रोम असल्याने तिच्या शरीरात मेल हार्मोन झपाट्याने वाढतात. त्यामुळेच तिच्या शरीरावर केसांचीही झपाट्याने वाढ होत आहे. या तिच्या आवस्थेमुळे ती इंग्लंडमधील माध्यमांमध्ये वारंवार झळकत राहिली आहे. तसेच लंडन फॅशन वीकमध्ये कॅटवॉक करणारी पहिली दाढीवाली महिला म्हणूनही तिने सहभाग घेतला होता.♍ फोटो पहा

 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম