आता काडीने नव्हे मोबाईलने पेटेल मेणबत्ती!

 आता काडीने नव्हे मोबाईलने पेटेल मेणबत्ती!



फेसबुक लिंक https://bit.ly/36fpovF
न्यूयॉर्क :एक अमेरिकन कंपनी ‘ल्यूडेला’ने जगातील पहिली ‘स्मार्ट मेणबत्ती’ तयार केली आहे. ही मेणबत्ती स्मार्टफोनच्या सहाय्याने पेटवता आणि विझवताही येऊ शकते. त्यासाठी आता काडीपेटीची गरज लागणार नाही.♍ शिवाय ही मेणबत्ती पाघळणारही नाही.

आता काडीने नव्हे मोबाईलने पेटेल मेणबत्ती!
वापरकर्त्याच्या इच्छेनुसार तिचा रंग बदलता येऊ शकेल तसेच ज्योतीचा आकारही लहान-मोठा करता येईल.
कंपनीने ही मेणबत्ती वाय-फायर तंत्राच्या मदतीने तयार केली आहे. ती कलात्मक तर आहेच, शिवाय सुरक्षितही आहे. तिच्यामुळे हाताला भाजण्याचा धोका नाही. लहान मुलंही ती पेटवू शकतील आणि त्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याची गरजही राहणार नाही. त्यासाठी स्मार्टफोनमध्ये ल्युडेला अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. त्यानंतर त्यावरील एका टचनेच अनेक मेणबत्त्या एकाच वेळी पेटवता येतील. या अॅपमध्ये एक चाईल्ड लॉकही आहे. त्यामुळे युजरची इच्छा असेल तर लहान मुलांना त्यापासून दूर ठेवता येऊ शकेल. कंपनीचे सीईओ जेमी बिआनचीनी यांनी सांगितले की, साधारण मेणबत्त्या एकाच वेळी पेटवणे
शक्य होत नाही. मात्र, या मेणबत्त्या स्मार्टफोनच्या सहाय्याने एकाच वेळी पेटवता येऊ शकतात. शिवाय त्यांच्यामध्ये सुंदर प्रकाश आणि सुगंधही आहे.♍ 🕯🕯🕯

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম