विंचवाचे 🦂विष सर्वात महागडे

विंचवाचे 🦂विष सर्वात महागडे  




.        दि. १८ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/32DoIOj
जगातील सर्वात महागड्या वस्तू कोणत्या? असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही हिरे, गाडी, बंगला, सोने किवा चांदी ही नावे घ्याल. मात्र, जगात असा एक जीव अस्तित्वात आहे की त्याच्या शरीरात तयार होणारा तरल पदार्थ म्हणजे विष हा जगातील सर्वात महागडा पदार्थ आहे. खासकरून वाळवंटात आढळणारे विंचू हे जास्त धोकादायक असतात. त्यांच्या विषाच्या एका थेंबातील काही अंशानेही कोणत्याही जीवाला मोठा धोका निर्माण होतो. अथवा प्रसंगी प्राणही संकटात सापडू शकतो. मात्र, याच विषामुळे अनेक आजारांवर औषध तयार केले जाते.

🦂विंचवाच्या विषानंतर दुसरा महागडा तरल पदार्थ म्हणजे किंग कोब्राचे विष होय. कोब्राच्या विषासाठी प्रतिगॅलन म्हणजे 3.7 लिटरला 1.53 लाख डॉलर्स मोजावे लागतात. यापासून वेदनाशमक औषधे तयार केली जातात. तर विंचवाच्या विषामध्ये सुमारे पाच लाखकेमिकल कंपाऊंड आढळतात.

विंचवाचे 🦂विष सर्वात महागडे

🦂यावर अद्याप संशोधनही झालेले नाही. यासाठीच या विषाला ‘कॉकटेल ऑफ बायोअॅक्टिव्ह’ असेही म्हटले जाते. विंचवापासून विष काढण्याच्या प्रक्रियेला ‘मिल्किंग’ असे म्हटले जाते. एका वेळेला एका विंचवापासून सुमारे 0.5 एमजी इतके विष मिळते. हा जगातील सर्वात महागडा तरल पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिगॅलन अथवा 3.7 लिटरची किंमत 3.90 कोटी डॉलर्स (2.81 अब्ज रुपये) इतकी आहे. या विषापासून सेलेरोसिस, आर्थिरिटिसमुळे मानवी शरीरात होणार्या असहनीय वेदनांवर उपचार केले जातात. जगभरात सध्या विंचवाच्या तब्बल चार हजार प्रजाती असल्या तरी यातील 40 प्रजातींच्या विषामुळे मानवी जीव धोक्यात येऊ शकतो.*🦂
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম