मोबाईल चोरांची ‘सांकेतिक भाषा

 मोबाईल चोरांची ‘सांकेतिक भाषा’  


.        📯 दि. ६ सप्टेंबर  २०२०📯 

फेसबुक लिंकhttps://bit.ly/3lWOyob     

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन आणि रस्त्यांवर दररोज सरासरी 150 मोबाईल फोन चोरीला जात असल्याच्या घटनांची नोंद विविध पोलिस ठाण्यात दाखल होत आहे. प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल फोन चोरी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकवेळा तर प्रवाशांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
यापूर्वी चोरलेले मोबाईल फोन मुंबई किंवा बाहेरील मोबाईल दुकानदार, मोबाईल रिपेरिंग करणारे सहज विकत घेत होते. मात्र पोलिसांनी चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यामुळे चोरीचा मोबाईल विकताना चोरांची पंचाईत व्हायला लागली. मात्र, आता हेच चोरीचे मोबईल फोन थेट बाहेरच्या देशाच्या जाऊ लागल्यामुळे मोबाईल चोरीच्या धंदा तेजीत सुरु झाला.

या धंद्यामध्ये मोबाईल चोर आणि कुरिअर करणाऱ्या मुख्य चोराचा कधी संबंध येत नाही. बस किंवा रेल्वेमध्ये रस्त्यावर चोरी करणाऱ्या छोट्या चोराला सांकेतिक भाषेत 'मशीन' म्हणतात, तर मोबाईलला कौआ म्हणतात. हे मशीन मध्यस्थाद्वारे मुख्य चोराकडे जातात. तिथूनच पुढे हा मोबाईल कुरिअर केला जातो.
मोबाईल चोरांची‘मशीन’ ला ‘कावळा’ मिळाला आहे आणि त्याने या ‘कावळ्या’ला ‘रंग बदलण्यासाठी’ पाठवले आहे. ही भाषा सामान्यांना न समजण्यासारखी असून एका वाक्याचा दुसर्या वाक्याला काहीही संदर्भ लागत नाही. मात्र मुंबई पोलिस या शब्दांचे अर्थ चांगले जाणून आहे.
तसे पाहिले तर, ही भाषा म्हणजे मोबाईल फोन चोरणार्या टोळीच्या सांकेतिक भाषेचा एक भाग आहे. या वाक्याचा अर्थ असा की, टोळीचा प्रमुख (मशीन) याने फोन (कावळा) चोरला आहे आणि त्याला आयएमइआय नंबर (रंग बदलणे) बदलण्यासाठी पाठवला आहे. आयएमइआय नंबर हा प्रत्येक फोनची व्यक्तिगत ओळख असते. या क्रमांकाने मोबाईलचा किंवा फोन नंबरचा शोध लागू शकतो. म्हणून मोबाईल चोर नंबर बदलल्यानंतरच त्याची विक्री करतात.मोबाईल चोरणारी मंडळी ही टोळीच्या रूपातूनच वावरत असते. ते आपापसात बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करत असतात. मुंबईतून फोन चोरून तो देशाच्या पूर्व भागात तसेच बांगला देशामध्ये विक्री करत होते. अशीच मोबाईलची विक्री करणारी झारखंडमधील टोळी पकडल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. मुंबईत अशा प्रकारच्या अनेक टोळ्या सक्रिय असून त्यांच्या सांकेतिक भाषेचा अर्थ पोलिसांनी काढला आहे.
टोळीतील सदस्यांची नावे गोपनीय
पोलिसांच्या मते, प्रत्येक टोळीत एक विशेष व्यक्ती असतो त्यास ‘मशीन’ असे म्हटले जाते. तो कोणत्याही प्रवाशाचा ‘कावळा’ (मोबाईल) चोरत असतो. हा व्यक्ती मोबाईल चोरीपासून ते फोनचा आयएमइआय नंबर बदलेपर्यंत तसेच त्याची विक्री करण्यातही प्रमुख भूमिका बजावत असतो.
असे चोरतात फोन

मोबाईल चोरांची ‘सांकेतिक भाषा’

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম