माहिती सेवा म्हणजे काय आहे ?



माहिती सेवा म्हणजे काय आहे ? 


२०१३ नंतर डिजिटल क्रांती वेगाने होत होती.लोकांच्या हाती मोबाईल आला. खेडोपाडी सुध्दा टचस्क्रीन मोबाईल, इंटरनेटची लोकांना आोळख होऊ लागली.फेसबुक, व्हॉटसअपचा वापर वाढु लागला.या दरम्यान २०१६ मध्ये जीआोने 4g आणले आणि लोकांना माहिती पुरवण्यासाठी एका संकल्पतेतुन व्हॉटसअपवर 'माहिती सेवा ग्रुप' चा जन्म झाला. 

माहिती सेवा ग्रुप दोन सेवा प्रदान करते

१) लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मागणी येण्यापूर्वीच काही सेवांची निर्मिती मेसेजद्वारे केली जाते. अशा सेवांना मागणीपूर्व माहिती सेवा असे म्हणतात.

उदा.एखाद्या गोष्टीची लोकांना माहिती देणे जी नंतर घडणार आहे. 

२. मागणीवर आधारित माहिती सेवा: यामध्ये डिजिटल वाचकांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या माहितीविषयक सेवा दिल्या जातात त्यांना मागणी आधारित सेवा असे म्हणतात. 

उदा.चालू घडामोडी, बातम्या

माहिती सेवाचे प्रकार

'माहिती सेवा ग्रुप' मार्फत  प्रमुख सेवा दिल्या जातात. 

१) एखादी घटना घडली आहे ती त्वरीत ग्रूप मार्फत लोकांना कळवणे.जी ताजी असते. 

२) अशी एखादी घटना वा माहिती जी घडुन गेली आहे परंतु तिच्याद्वारे लोकांना अज्ञात गोष्टी ज्ञात होतील. 

३) बेबसाईट : ही डिजिटल सेवा लोकांच्या मागणीनुसार,त्यांचा हेतू,  विषय, माहितीविषयक गरज या आधारे उपलब्ध असलेली किंवा विविध डेटा बेसमधून माहिती संकलित करून त्यांची सूची करून बेबसाईट मध्ये साठवली जाते व लोकांना ती केव्हाही वाचण्यासाठी बेबसाईटद्वारा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये विविध विषयांवर लेख, अनेकांचे संशोधन अहवाल, संशोधन प्रकल्प, मानके,मनोरंजनात्मक गोष्टी, इतिहासाचा धांडोळा इत्यादींचा थोडक्यात सारांश संबंधित प्रलेखांच्या सूचीय तपशिलासह एकत्रितरित्या संकलित करून लोकापर्यंत सारस्वरूप विविध सोशल मिडिया मार्फत प्रसारित केला जातो.

'माहिती सेवा ग्रुप'चा उध्देश

 विविध प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी लोक  इंटरनेट व वेबचा वापर करतात. बरेचसे लोक यासाठी गुगल व याहू या सर्च इंजिन चा वापर करून माहिती शोधण्याचा व मिळवण्याचा प्रयत्न करतात.यासाठी  वेब व इंटरनेट आधारित सेवा देण्यासाठी विविध माहिती स्त्रोतांची आवश्यकता भासते व त्याची उपलब्धता इंटरनेट वर असावी लागते.ही कमतरता भरून काढणे हा  'माहिती सेवा ग्रूप'चा मुख्य उद्देश आहे. 

माहिती सेवा म्हणजे काय आहे?

विविध माहितीचे आदानप्रदान व्हावे यासाठी ग्रूपने सोशल मीडियावर ही ज्ञानगंगा आणली आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম