सातबारा मध्ये नविन बदल

 सातबारा मध्ये नविन बदल 

पन्नास वर्षांनंतर प्रथमच बदल 
---
काय असणार आहे बदल
दि ५ सप्टेंबर २०२०
सातबारा म्हणजे जमिनी मालकी (भोगवटादार) असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असले क्षेत्र, तर बारा मध्ये पीकपाण्याची नोंद असते. त्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटले जाते. आता त्याच्या नमुन्यामध्ये बदल होणार असल्यामुळे तो समजण्यासाठी अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होणार आहे.
सातबारा उतारा अधिक सुटसुटीत व सोपा व्हावा. तसेच तो माहितीपूर्ण व्हावा, यासाठी संगणकीकृत सातबारा उताराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास मान्यता मिळाली आहे.
संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात (७/१२) बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसात नव्या स्वरूपातील सातबारा उतारा आता नागरिकांना उपलब्ध होणार आहे. पन्नास वर्षांनंतर प्रथमच बदल करण्यात आलेल्या सातबारा उताऱ्यावर शासनाचा व ई. महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे. शेती व बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असणार आहे.. ब्रिटीश काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये १९४१ मध्ये एम. जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास आठ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
गाव नमुना नंबर ७ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडी योग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही. मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
🔹 नविन सातबारा उतारयात असा होणार बदल
▪️आता गाव नमुना सातबारा व ८ (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क असणार आहे.
▪️गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड असणार आहे.
▪️लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.
▪️खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.
▪️मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे.
▪️नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.


सातबारा मध्ये नविन बदल

सातबारा उतारा हा वाचनास अधिक सोपा आणि सुटसुटीत व्हावा, यासाठी सातबारा उताराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.ऑनलाइन सातबारा उताऱ्यामध्ये सुरक्षिततेसाठी वॉटरमार्क आणि ई महाभुमीचा लोगो वापरण्यात येणार आहे.
अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-व्रिकी करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहेत आणि घडत आहेत. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম