या गावात ६००० हजार लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक

🔹 शिक्षकदिन विशेष 🔹

 या गावात ६००० हजार  लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक   



.        📯 दि. ५ सप्टेंबर  २०२० 📯

फेसबुक लिंकhttps://bit.ly/2Zaux3x
  .      अहमदाबाद- शिक्षकांचे गाव म्हणून गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हडियोलची ओळख आहे. गावातील प्रत्येक घरात एक तरी शिक्षक मिळेलच. गावची लोकसंख्या ६ हजार असून यात एक हजार जण तर शिक्षकच आहेत. त्यातील ७९० लोक आजही अध्यापनाचे कार्य करत आहेत. उर्वरित २०० शिक्षकांनी निवृत्ती घेतली. हडियोलमधील शिक्षक शिकवत नसेल असा गुजरातमध्ये एकही जिल्हा उरला नाही. जिल्ह्यातील कुठल्या ना कुठल्या गावात येथील शिक्षक आहेच.

साबरकांठा प्राथमिक शिक्षक संघाचे प्रमुख संजय पटेल म्हणाले की, शिक्षकांचे गाव अशी ओळख हडियोलला पहिल्यांदा १९५५ मध्ये मिळाली. त्या वेळी गावातील ३ लोकांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,याच वेळी गोविंदभाई रावल व त्यांच्या पत्नी सुमती यांनी विश्व मंगल संस्थेमार्फत शिक्षणाचे महत्त्व पटवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्या वेळेपासून आजवर गावातून शिक्षक निर्माण होण्याचा पायंडा पडला आणि आजही तो कायम आहे. १९५९ मध्ये रावल दांपत्याने गावात एका मंदिरात पहिली शाळा उघडली. त्यानंतर शिक्षणासाठी “विश्व मंगलम् अनेरा’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ५ हजार मुलींना शिक्षण घेता आले. हडियोल गावचा आदर्श घेऊन गठोडा, आकोदरा आणि पुराल गावांमध्येही शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:

या गावात ६००० हजार  लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक
°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম