रामायण एखादी काल्पनिक घटना नाही, सत्य सिद्ध करतात हे 21 तथ्य

 रामायण एखादी काल्पनिक घटना नाही, सत्य सिद्ध करतात हे 21 तथ्य 

रामायण एखादी काल्पनिक घटना नाही,
फेसबुक लिंक https://bit.ly/33MhF6t

रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध करतात. मंगळवार (11 ऑक्टोबर)ला विजयादशमीचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जाईल. या निमित्ताने आम्ही तुम्हाला रामायण काळातील काही खास ठिकाणांची माहिती देत आहोत.
1. कोब्रा हूड गुहा,श्रीलंका
असे सांगितले जाते की, रावण देवी सीतेचे हरण करून जेव्हा लंकेत पोहोचला, तेव्हा सर्वात पहिले त्याने देवी सीतेला याच ठिकाणी ठेवले होते. या गुहेवरील नक्षीकाम या गोष्टीचा पुरावा देते♍   
2. हनुमान गढी
हे तेच ठिकाण आहे, जेथे हनुमानाने भगवान श्रीराम यांची वाट पाहिली होती. रामायणात यासंदर्भात लिहिण्यात आले आहे. अयोध्यामध्ये आजही या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे.
3. बजरंगबली हनुमानाचे पद चिन्ह
जेव्हा हनुमान देवी सीतेला शोधण्यासाठी समुद्र पार करून निघाले तेव्हा त्यांनी भव्य रूप धारण केले होते. या कारणामुळे श्रीलंकेत पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाचे मोठमोठे ठसे तेथे उमटले, जे आजही त्याठिकाणी आहेत.
4. राम सेतू
रामायण आणि भागण राम असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे समुद्रावर श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सेतूविषयी रामायणात लिहिण्यात आले आहे. वर्तमानात या सेतूचा शोध लावण्यात आला आहे. हा सेतू दगडांनी बांधलेला असून हे दगड पाण्यावर तरंगतात.
5. पुरातत्व विभागानेसुद्धा केले आहे मान्य
भगवान श्रीराम पृथ्वीतलावर होते ही गोष्ट पुरातत्व विभागानेसुद्धा मान्य केली आहे. पुरातत्व विभागानुसार 1,750,000 वर्षांपूर्वी श्रीलंकेत सर्वात पहिले मनुष्य वस्ती असल्याचे सांगण्यात येते आणि रामसेतूसुद्धा याच काळातील आहे.
6. पाण्यावर तरंगणारे दगड
रामसेतू पुलावरील दगड पाण्यावर तरंगत होते. सुनामीनंतर रामेश्वरममध्ये त्या सेतुमधून निखळलेले काही दगड जमिनीवर आले होते. वैज्ञानिकांनी ते दगड पुन्हा पाण्यात टाकल्यानंतर दगड तरंगू लागले आणि तेथील सामान्य दगड पाण्यात टाकल्यानंतर ते बुडत होते.
7. द्रोणागिरी पर्वत
युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण मेघनाथच्या अस्त्र प्रहाराने बेशुद्ध पडले तेव्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणली होती. आजही हा पर्वत या घटनेचा साक्षी आहे.
8. श्रीलंकेत हिमालयातील औषधी वनस्पती
श्रीलंकेत ज्या ठिकाणी लक्ष्मणाला संजीवनी देण्यात आली होते, त्या ठिकाणी हिमालयातील दुर्लभ औषधी वनस्पतीचे अंश आढळून आले आहेत. संपूर्ण श्रीलंकामध्ये या वनस्पती नाहीत आणि हिमालयातील या वनस्पती श्रीलंकेत आढळून येणे हा या गोष्टीचा मोठा पुरावा आहे.
9. अशोक वाटिका
देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावणाने त्यांना अशोक वाटिकेत ठेवले होते, कारण सीता देवीने रावणाच्या महालात राहण्यास विरोध केला होता. आज त्या ठिकाणाला Hakgala Botanical Garden म्हणतात आणि ज्या ठिकाणी सीतेला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणाला 'सीता एल्या’ म्हटले जाते.
10. लेपाक्षी मंदिर
देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावण त्यांना आकाश मार्गाने लंकेत घेऊन जाताना तेव्हा त्याला थांबवण्यासाठी जटायू पक्षी आला होता. रावणाने जटायूचा वध केला. आकाशातून जटायू यात ठिकाणी पडले होते. सध्या येथे लेपाक्षी नावाचे एक मंदिर आहे.
11. टस्क हत्ती
रामायणातील एक अध्याय, सुंदरकांडमध्ये श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी एक विशालकाय हत्ती होता असे वर्णन आहे. या हत्तीला हनुमानाने यमसदनी पाठवले होते असे सांगण्यात येते. पुरातत्व विभागाला श्रीलंकेत अशाच हत्तीचे अवशेष मिळाले असून यांचा आकार सामान्य हत्तीपेक्षा खूप मोठा आहे.
12. कोंडा कट्टू गाला
हनुमानाने लंका जाळल्यानंतर रावण घाबरला आणि हनुमानाने पुन्हा हल्ला करू नये यासाठी त्याने देवी सीतेला अशोक वाटीकेतून काढून कोंडा कट्टू गाला येथे ठेवले. पुरातत्व विभागाला येथे काही गुहा आढळून आल्या, ज्या रावणाच्या महालापर्यंत जातात.
13. रावणाचा महाल
पुरातत्व विभागाला श्रीलंकेत रावणाचा एक महाल आढळून आला आहे. जो रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. या महालातून निघालेले गुप्त मार्ग शहराच्या मुख्य ठिकाणापर्यंत पोहोचतात.
14. कालानिया
रावणाचा मृत्यू झाल्यानंतर विभीषणला लंकेचा राजा बनवण्यात आले होते. विभीषणाने आपला महाल कालनियामध्ये बदलला होता. जे कैलास नदीच्या काढावर आहे. पुरातत्त्व विभागाला त्या नदीच्या किना-यावर महालाचे काही अवशेष मिळाले आहेत.
15. लंका जळाल्याचे अवशेष
रामायणानुसार हनुमानाने संपुर्ण लंका जाळली होती. त्या ठिकाणावरील जमीन आजही काळी झालेली आहे. त्याच्या आजुबाजूच्या जमीनीचा रंग जसाच्या तसाच आहे.
16. दिवूरमपोला श्रीलंका
रावणाकडून सोडवून आणल्यानंतर रामाने सितेला पवित्रता सिध्द करण्यासाठी अग्नी परिक्षा द्यायला लावली होती. ज्या झाडाखाली सितेने अग्नी परिक्षा दिली होती ते झाड आजही उपलब्ध आहे. लोक आज तेथे महत्त्वाचे निर्णय घेतात.
17. रामलिंगम
रामाने जेव्हा रावणाला मारले होते तेव्हा त्यांना या पापातून मुक्त व्यायचे होते. कारण त्यांनी एका ब्राह्मणाला मारले होते. यासाठी त्यांनी महादेवाची आराधना केली. तेव्हा महादेवाने त्यांना चार शिवलिंग बनवण्यास सांगितले. तेव्हा सीतेने एक लिंग बनवले ते वाळूचे होते. दोन शिवलिंग हनुमानने कैलासामधून आणलेले आहेत आणि रामाने स्वतःच्या हाताने एक शवलिंग बनवले. जे आजही या मंदिरात स्थित आहे. यामुळेच या ठिकाणाला रामलिंगम असे म्हणतात.
18. जानकी मंदिर
नेपाळच्या जनकपुर शहरात जानकी मंदिर आहे. सीतेच्या वडिलांचे नाव जनक होते. त्यांच्या नावावरुनच या शहराचे नाव जनकपुर ठेवले. सितेला जानकी म्हटले जात होते. यामुळे या मंदिराचे नाव जानकी असे पडले.
19. पंचवटी
नाशिक जवळ आजही पंचवटी तपोवन आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केले होते. लक्ष्मणाने येथे सूपनाखाचे नाक कापले होते.
20. कोणेश्वरम मंदिर
रावण महादेवाची आराधना करत होता त्यांना महादेवाच्या मंदिराची स्थापना केली होती. महादेवापेक्षा रावणाची मोठी मुर्ती असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. म्हटले जाते की, रावणाचे दहा डोके होते आणि प्रत्येक डोक्याच्या मुकूटावर त्यांच्या दहा ठिकाणाचे अधिपत्य दर्शवलेले होते.
21. गरम पाण्याच्या विहिरी
रावणाने कोणेश्वरम मंदिराजवळ गरम पाण्याच्या विहिरी बनवल्या होत्या, त्या आजही आहेत.♍     
            ● संकलन
            📞@9890875498         

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম