सॅनिटरी पॅड्सचा शोध कोणी लावला

🅰️ सॅनिटरी पॅड्सचा शोध कोणी लावला 🅰️
_______________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________

फेसबुक लिंक http://bit.ly/2HbjEIU
सॅनिटरी पॅड्सचं नाव ऐकताच आजही लोक नाक-तोंड वाकडं करू लागतात. कारण हा याचा संबंध महिलांच्या मासिळ पाळीशी आहे. त्यामुळे समाज सॅनिटरी पॅड्सला त्यांचांच भाग मानतात. पण महिलांसमोर सॅनिटरी पॅडचं नाव घेण्यासही लाज वाटणाऱ्या पुरूषांना हे माहीत नाही की, पहिल्यांदा हे पॅड महिलांसाठी नाही तर पुरूषांसाठी तयार करण्यात आले होते.


माय पिरिअड ब्लॉगच्या एका पोस्टनुसार, सर्वात आधी सॅनिटरी पॅटचा वापर पहिल्या महायुद्धादरम्यान केला गेला होता. फ्रान्सचा नर्सनी पहिल्या महायुद्धावेळी जखमी सैनिकांचं वाहणारं रक्त रोखण्यासाठी पहिल्यांदा हे पॅड तयार केले होते. असे सांगतात की, हे नॅपकिन बेंजमिन फ्रेंकलिन यांनी एका आविष्कारातून प्रेरित होऊन तयार केले होते. त्यावेळी हे नॅपकिन तयार करताना काळजी घेण्यात आली होती की, याने सहजपणे रक्त शोषलं जावं. आणि एकदा वापर केल्यावर याला सहजपणे नष्ट करता यावं. जेव्हा फ्रान्सच्या सैनिकांसाठी सॅनिटरी पॅड तयार करण्यात आले, तेव्हा फ्रान्समध्ये काम करणाऱ्या अमेरिकन नर्सनी यांचा वापर मासिक पाळीदरम्यान करणे सुरू केले.१८८८ मध्ये कॉटेक्स नावाच्या कंपनीने युद्धात प्रयोग केल्या गेलेल्या आधारावरच 'सॅनिटरी टॉवल्स फॉप लेडीज' नावाने सॅनिटरी पॅडचं निर्माण सुरू केलं. १८८६ मध्ये याआधी जॉनसन अॅन्ड जॉनसनने लिस्टर्स टावल्स नावाने डिस्पोजबल नॅपकिन्स तयार करण्यास सुरूवात केली. हे नॅपकिन्स रूईप्रमाणे दुसऱ्या फायबरला अब्जॉर्बेट लायनरने कव्हर करून तयार केले जात होते. पण हे त्यावेळी इतके महाग होते की, महिला त्या खरेदी करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी केवळ श्रीमंत घरातील महिलाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत होत्या.

काळानुसार सॅनिटरी नॅपकिनच्या रूपात बराच बदल झाला. हळूहळू हे सामान्य महिलांसाठीही उपलब्ध होऊ लागले. पण आजही आपल्या देशात अनेक महिलांकडे सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. आणि त्यामुळे त्या त्यांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी याचा वापर करू शकत नाहीत.

आजही सॅनिटरी नॅपकिनकडे किंवा मासिक पाळीकडे आपला समाज चांगल्या नजरेने बघत नाही. आजही यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. लोक आजही मासिक पाळी शब्द उच्चारला तरी अवघडतात. इतकंच काय तर आपल्याच शारीरिक प्रक्रियेबाबत महिला बिनधास्तपणे बोलू शकत नाहीत.

कोरा लिंक http://bit.ly/31mzwPN

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম