देशातील सर्वात उंच जोडपे! पुण्यात

 देशातील सर्वात उंच जोडपे! पुण्यात 
    

फेसबुक लिंक http://bit.ly/349ENvU
करवा चौथच्या निमित्ताने देशभरातील काही ‘हट के’ जोडप्यांची चर्चा झाली. आपल्या पुण्यातही असेच एक जोडपे आहे. त्यांच्याकडे पाहिले की ‘रबने बना दी जोडी’ असे सहज उद्गार निघू शकतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोघांची उंची. हे दोघेही पती-पत्नी अतिशय उंच असून, त्याबाबत त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुकमध्येही झाली आहे.

देशातील सर्वात उंच जोडपे! पुण्यात

पुण्यात पिंपरी येथे राहणारे हे शरद आणि संजोत कुलकर्णी दाम्पत्य. 56 वर्षांच्या शरद यांची उंची तब्बल 7 फूट 1.5 इंच इतकी आहे. त्यांच्या 49 वर्षीय पत्नी संजोत यांची उंची 6 फूट 2.6 इंच आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या दोन्ही मुलींची उंचीही सहा फूट आहे. त्यांची थोरली कन्या मुरूगा 26 वर्षांची असून तिची उंची 6 फूट आहे तर धाकटी सान्या वीस वर्षांची असून तिची उंची 6 फूट चार इंच आहे. 1989 मध्ये शरद आणि संजोत यांचा विवाह झाला होता. संजोत यांच्या उंचीमुळे त्यांना वर शोधणे कठीण झाले होते. अशावेळी त्यांच्या आजीने घराजवळच भाजी खरेदी करीत असलेल्या शरद यांना पाहिले. त्यांनी थेट त्यांच्याजवळ जाऊन चक्क नातीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि हे लग्न झाले!
या जोडप्याला दोन मुली त्याही आईबाबासारख्या उंच आहेत.



अहो, अडचणी येतातच ना. मला साध्या दरवाजातून आत शिरायचं म्हटलं तरी त्रास होतो. घराचाही दरवाजा आठ फुटांचा करून घ्यावा लागला.’

‘कोणत्याही चारचाकी गाडीमध्ये मी ड्रायव्हिंग सीटवर बसूच शकत नाही कारण मान दुमडून घेतली तरी डोके छताला लागते.’

‘स्वयंपाकाचा ओटा. त्यावर स्वयंपाक करायचा तरी माझ्या पत्नीला खूपच खाली वाकावे लागते. म्हणून मग तिच्यासाठी खास वेगळ्य़ा उंचीचा ओटा आम्ही बनवून घेतला आहे.’

‘आम्ही मुली सामान्य आकाराच्या पलंगावर झोपू शकत नाहीत कारण कितीही केले तरी पाय पलंगाबाहेरच येतात. मग आम्हाला वेगळा पलंगही बनवून घ्यावा लागला.’

‘भारतातल्या कोणत्याही दुकानात आमच्या मापाचे जोडे मिळत नाहीत मग परदेशातूनच मागवण्याशिवाय चॉईस नसतो.’ ‘रेडिमेड कपडे सोडाच.. कपडे घ्यायचे म्हणजे ताग्यातूनच कापड घ्यावे लागते.’

पुण्यातील एका सामान्य मध्यमवर्गीय कुलकर्णी कुटुंबाचे हे अनुभव! पण जगावेगळे.कारण एकच-कुटुंबातल्या प्रत्येकाची उंची किमान सहा फुटांपेक्षा अधिक.हे सारे कुटुंबच इतके उंच असल्याने गिनीज बुकही बुचकळ्य़ात पडले आहे.त्यांचेही बरोबर आहे. आजवर एकट्या उंच माणसांचे कितीतरी विक्रम झाले;पण सगळे

 ▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁  
            ● संकलन
            📞@9890875498           

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম