...तर सोनियांऐवजी 'ही' असती गांधी घराण्याची सून; इंदिरा गांधींना पसंत होती मुलगी!

   ...तर सोनियांऐवजी 'ही' असती गांधी घराण्याची सून; इंदिरा गांधींना पसंत होती मुलगी !   


.        📯 दि  १ आॅक्टोबंर २०२० 📯

फेसबुक लिंक https://bit.ly/2Sg1N5O
  .         राजकारणात प्रभावी असलेल्या गांधी नेहरू कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कपूर परिवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. परंतु हे फार मोजक्याच लोकांना माहीत असावे, की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतःचा मुलगा राजीव गांधींचं लग्न दिवंगत राज कपूर यांच्या मुलीशी करणार होते. पत्रकार रशीद किदवई यांनी पुस्तकातून हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ‘नेता अभिनेता: बॉलिवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ हे पुस्तक लिहिलं आहे, त्यात हा खुलासा केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्यात गहन मैत्री होती आणि इंदिराजींच्या मनातही कपूर कुटुंबीयांबाबत प्रचंड आदर व सन्मान होता.

तर सोनियांऐवजी 'ही' असती गांधी घराण्याची सून; इंदिरा गांधींना पसंत होती मुलगी !


पुस्तकातील माहितीनुसार, इंदिरा गांधींना वाटत होतं की, दोन्ही कुटुंबीयांमधील संबंध पुढे जावेत. त्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं लग्न राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतूशी करण्याची इंदिरा गांधींची मनीषा होती. स्वतःच्या पुस्तकात रशीद लिहितात, असं नव्हे की इंदिरा गांधींना बॉलिवूड क्षेत्रातली सून हवी होती. त्यांना चित्रपटसृष्टीबाबत फार आत्मियता नव्हती, परंतु त्यांच्या मनात कपूर परिवाराबाबत नितांत आदर होता. राज कपूर यांच्या मुलीशी राजीव गांधींचं लग्न लावून देण्याची इंदिरा गांधींची इच्छा काही पूर्ण झाली नाही. राजीव गांधी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं जेव्हा ब्रिटेनला गेले तेव्हा केंब्रिज विद्यापीठात त्यांची ओळख सोनिया मायनो( सोनिया गांधीं )शी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले आणि त्यांनी 1968मध्ये लग्न केलं.
रशीद पुस्तकात लिहितात, राज कपूर यांची नात आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरनंही 2002मध्ये राहुल गांधी आवडत असल्याचं सांगितलं होतं. तसेच राहुल गांधीही करिनाचा सिनेमा पहिला दिवस, पहिला शो पाहायला विसरायचे नाहीत, असं कथित स्वरूपात सांगितले जाते. एका टीव्ही शो कार्यक्रमादरम्यान जेव्हा करिनाला कोणाला डेट करायला आवडेल, असं विचारण्यात आलं. त्यावेळीही तिने राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं. मला त्यांना समजून घेण्यात काहीही अडचण नाही, मी त्यांचे फोटो पाहिले आहेत. परंतु 2009मध्ये करिनानं या विधानावर करिनानं यू-टर्न घेतला आणि राहुल गांधी आवडत होते, असं म्हटलं. तसेच आम्ही दोघेही आडनावामुळे प्रसिद्ध असल्याचंही करिनानं यावेळी अधोरेखित केलं. त्यांना पंतप्रधान बनताना मी पाहू इच्छिते, परंतु नक्कीच मी त्यांना डेट करू इच्छित नाही, असा खुलासाही करिनानं केला होता.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম