असामान्य गायक म. रफी
दि. २५ डिसेंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/3ho3d9V
मोहम्मद रफींच्या विषयी संगीतकार नौशाद नेहमी एक किस्सा सांगतात. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यायची होती. या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली.या गुन्हेगारानं त्याच्या कुटुंबाला भेटण्याची, विशेष खाद्यपदार्थांची मागणी केली नाही. तर त्यानं इच्छा व्यक्त केली की, त्याला 'बैजू बावरा' सिनेमातलं 'ऐ दुनिया के रखवाले' हे गाणं ऐकायचं आहे.त्यानंतर एक टेपरेकॉर्डर आणून त्याला हे गाणं ऐकवण्यात आलं.
ते भारतातले सर्वात लोकप्रिय पार्श्वगायक बनले. 4 फेब्रुवारी 1980ला श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना एका विशेष शोसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यासाठी 12 लाख लोक जमले होते. तो त्या काळातील जागतिक विक्रम होता.
श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने आणि पंतप्रधान प्रेमादासा कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जाणार होते. पण रफींच्या गायनानं त्यांना असं काही मोहीत केलं की, ते कार्यक्रम संपेपर्यंत तिथंच थांबून राहिले.
रफी यांची सून यास्मीन खालिद यांनी रफी यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. त्या म्हणतात, "रफी परदेशात गेले की तिथल्या भाषेतलं एक गाणं म्हणत. श्रीलंकेत रफी यांनी सिंहला भाषेत गाणं ऐकवलं."ते हिंदीत गाऊ लागले आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. या गर्दीत हिंदी समजणारे फारच कमी लोक असतील.रफी यांचा सर्वोत्तम कालखंड होता तो म्हणजे 1956 ते 1965. याकाळात त्यांनी 6 वेळा फिल्मफेअर मिळवला. रेडिओ सिलोनवरील 'बिनाका गीतमाला'वर तब्बल 2 दशक त्यांचा प्रभाव आहे.रफी मितभाषी, विनम्र आणि मधाळ होते. तसंच त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं. बॉलीवूडमधल्या पार्ट्यांना जायला त्यांना आवडत नसे. रेकॉर्डिंगला जाताना ते नेहमी पांढरे कपडे परिधान करत असत.
त्यांनी स्टाईलिश घड्याळं आणि फॅन्सी गाड्यांचा छंद जोपासला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, रफींना बॉक्सिंगचा मोठा षौक होता. मोहम्मद अली हे त्यांचे आवडते बॉक्सर होते. 1977ला एका शोसाठी ते शिकागोला गेले होते. त्यावेळी रफी यांची ही आवड आयोजकांना समजली. त्यांनी रफी आणि मोहम्मद अली यांची भेट घडवण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे तितकं सोपही नव्हतं.1967ला जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाला तेव्हा त्यांनी तो नाकारण्याचा विचार केला होता. पण त्यांना असा सल्ला देण्यात आला की, ते एका विशिष्ट समजातून आहेत. जर पुरस्कार नाकारला, तर गैरसमज होतील. जर त्यांनी तसं केलं असतं आणि वाट पाहिली असती, तर त्यांना पद्मभूषण मिळाला असता आणि तेवढी त्यांची योग्यता होती."
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi
Tags
व्यक्ति