यामुळे हॉटेलमध्ये नसते '४२०' नंबरची खोली
फेसबुक लिंक http://bit.ly/2JjMjNd
तुम्ही बाहेर गेल्यानंतर अनेक वेळा हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल. परंतु कधी तुम्ही नोटीस केले आहे का, तेथे खोली नंबर ४२० आहे की नाही? कदाचित नसेलही, कारण अनेक हॉटेलमध्ये या नंबरची खोली नसते. याच्या मागे काही कारणेही आहेत.
२० एप्रिल हा इंटरनॅशनल वीड-डे म्हणून साजरा केला जातो. वीड डे म्हणजे या दिवशी सिगारेट, तंबांकू, ड्रिंक आदींचे सेवन केले जाते. म्हणजेच थोडक्यात हा दिवस धुम्रपान म्हणून साजरा करातात. लोक या दिवशी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी स्मोकिंग करुन सरकारने यावर घातलेल्या बंदीचा निषेध करतात. अजूनही देशात अंधश्रद्धा आहे. अनेक लोकांचे असे मत आहे, की ४२० नंबरची खोली ही अशुभ असते. त्यांना असे वाटते, की हा नंबर आपल्याला मिळाला का काहीतरी अशुभ घडते आणि संकटाशी सामना करावा लागतो. तसेच भारतीय दंड विधान कायद्यानुसार, फसवणूक, धोकेबाजी या गुन्ह्याखाली कलम ४२० अंतर्गत कारवाई करण्यात येते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,एका मीडिया रिपोर्टनुसार, उत्तराखंडच्या सचिवालयामध्येही खोली नंबर ४२० नव्हती. काही अधिकाऱ्यांचे मत आहे, की हा नंबर चुकीच्या कामाशी, फसवणूक या गोष्टींशी संबंधित आहे. तसेच काहींनी असे सांगितले, की हा नंबर धोकेबाजाशी संबधित असल्याने सचिवांच्या खोलीचे नंबर ४१९ आणि ४२१ आहे, पण ४२० नाही.काही वर्षापूर्वी हॉटलमध्ये ४२० नंबरची खोली होती, मात्र ही काही कपल्सनी बुक केल्यानंतर काही विचित्र गोष्टी समोर आल्या. यामुळे हॉटेल मालकाने त्रस्त होऊन ही खोलीची बंद केली. यानंतर हळूहळू हा नंबर काढूनच टाकण्यात आला.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_