आता इंजेक्शन दुखणार नाही

आता  इंजेक्शन दुखणार नाही   


✨दि. १५ डिसेंबर  २०२० 

फेसबुक लिंक http://bit.ly/2Wh9tqk
इंजेक्शनची भीती केवळ मुलांनाच वाटते असे नाही. भलेभले प्रौढ गृहस्थही इंजेक्शनची सुई पाहिल्यावर कोकरासारखे बसतात! अर्थात काही लोक गोंदून घेतल्याच्या हौसेने टोचून घेत असतात ते वेगळे; पण बहुतेकांना इंजेक्शनची भीती ही वाटतेच. आता या भीतीमधून मुक्‍ती देण्यासाठी संशोधकांनी ‘कम्फर्टेब्ली नम्ब’ हे उपकरण विकसित केले आहे. याच्यामुळे इंजेक्शन घेताना होणार्‍या वेदना एका मिनिटात कमी होतात. 

आता  इंजेक्शन दुखणार नाही

संशोधक ग्रेग लिसन, अँडी झँग आणि माईक हुआ या तिघांनी मिळून हे छोटे उपकरण बनवले आहे. याबाबत हुआ म्हणाले,‘आम्ही केलेल्या पाहणीत सुमारे वीस टक्के लोकांना डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यायची भीती वाटते, असे जाणवले. आम्ही बनविलेल्या या थ्रीडी प्रिटेंड‘नम्ब’मध्ये दोन वेगवेगळे चेंबर असून, त्यात अमोनिअम नायट्रेट आणि पाणी आहे. थोडेसे हलविल्यास त्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. या डिव्हाईसचा धातूचा पृष्ठभाग त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर तो भाग काही सेकंदात बधिर होतो.
सध्या वापरत असलेल्या पद्धतीत त्वचा बधिर व्हायला बराच काळ लागतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इंजेक्शनची भीती वाटणार्‍यांसाठी हे उपकरण फार उपयुक्‍त ठरेल.
💉
=

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম