आज जागतिक 🍵 चहा दिन
फेसबुक लिंक http://bit.ly/3njNXwR
🍵 आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..🍵
कल्हई काढलेल्या चकचकीत पितळी भांड्यात आलेली उकळी... कधी एकदा हा दूग्धशर्करा योग जुळून येतो अन् पृथ्वीवरच्या अमृताचा घोट ओठात आणि ओठातून घशात उतरतो याची प्रतिक्षा... उगीच नाही, याला अमृततुल्य म्हणत... अमृताशीच ज्याची तुलना होऊ शकते असा हा वाफाळलेला चहा मनाला उभारी आणतो, शरिर ताजंतवानं करतो आणि चहाच्या कपाभोवती झालेली दोस्तीही पक्की असते म्हणतात... आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणारा हा इहलोकीचा अविष्कार म्हणूनच आपल्या सगळ्यांनाच प्रीय... म्हणूनच हा चहा पुण्याच्या संकृतीचा एक अविभाज्य भाग झालाय... 🍵चहासाठी पावडर कुठली आणि दूध कुठले याला इथं महत्व नाही.. हा चहा गाळण्याचा कपडा अत्युच्च गुणवत्तेचं प्रतीक आहे... चहावाल्यांच्या कित्येक पिढ्या हा अमृतयोग जुळवून आणताहेत...🍵
जगात चहाची शेती सर्वप्रथम चीनमध्ये करण्यात आली होती. यामागे एक कथा प्रचलित आहे. एकदी चीनचा सम्राट शेनॉन्ग त्याच्या बागेत बसून चहा पित होता. त्यावेळी एक पान त्या उकळत्या पाण्यात येऊन पडलं. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला आणि त्याला वेगळा सुगंधही आला. चीनच्या सम्राटाला त्याची चव खूप आवडली. त्यानंतर चहाचा शोध लागला असं म्हणतात.
चहाला अमृततुल्य मानण्याची परंपरा हा संशोधनाचा विषय असला तरी एरवी रोज बदलणा-या जगात पिढ्यान् पिढ्या टिकलेला हा चहा खास वैशिट्य बनलाय.चहामध्ये🍵गाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडीमध्ये मिळणारा हाय टी... चहाची कितीतरी रूपं... मात्र पुण्याच्या गल्लोगल्ली अस्तित्वात असलेली अमृतुल्ये आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत... या अमृततुल्य चहानंही अमृतप्राशन केलं असावं... 🍵
=
Tags
दिन