पैलवान हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे ♨

 पैलवान हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे 



. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी किताब मिळवला होता. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्रीपती खंचनाळे हे मुळचे सीमाभागातील एकसंबा या गावचे आहेत. ते कित्येक वर्षांपासुन कोल्हापुरात वास्तव्यास होते. यानंतर विविध कुस्ती स्पर्धेत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजवला.

पैलवान हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे

हिंदुस्तानातील कुस्तीतील सर्वोच्च हिंदकेसरी पदाचा बहुमान स्पर्धाच्या पहिल्याच वर्षी खेचून आणणारे नामांकित पैलवान म्हणजे पैलवान श्रीपती खंचनाळे होय. १९५९ मध्ये राजधानी दिल्लीतील न्यू रेल्वे स्टेडीयममध्ये साखळी फेरीतील सर्व- कुस्त्या चितपट मारून खंचनाळे अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम फेरीत गाठ पडली रुस्तुम-ए-पंजाब पैलवान बत्तासिंग बरोबर. या कुस्तीला पंच होते गुरू हनुमानसिंग (सतपालचे गुरू). दोघेही पैलवान तुल्यबळ असल्याने काट्यावरची लढत होती. क्षण-क्षणाला कुस्तीचे पारडे कधी या बाजूला तर, कधी त्या बाजूला झुकत होतं. 28 मिनिटे होऊन गेली तरी, निर्णय लागत नव्हता. त्यामुळे पंचानी कुस्ती अनिर्णित घोषित केली.

हिंदकेसरीपदाचे ते पहिलेच वर्ष असल्याने ती कुस्ती निकालीच करावी, असे खंचनाळेंचे मत पडले. त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता. संध्यांकाळी खंचनाळे यांनी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांची भेट घेतली व दुसऱ्या दिवशी सकाळी बेमुदत निकाली कुस्ती लावावी अशी विनंती केली. राष्ट्रपती कुस्तीचे चाहते होते त्यांनी ती मागणी मान्य केली व सकाळी दहाची वेळ दिली.

20 डिसेंबर 1959 रोजी सकाळी कुस्तीशौकीन लोकांचा महापूर दिल्लीच्या न्यू रेल्वे स्टेडीयमला आला होता. ही स्पर्धा देशाचा पहिला हिंदकेसरी कोण हे ठरवणार होती. कुस्ती पुकारण्यात आली पैलवान श्रीपती खंचनाळे महाराष्ट्र विरुध्द रुस्तुम-ए-पंजाब पैलवान बत्तासिंग. दोन महाकाय मल्ल एकमेकांशी झुंजु लागले. डाव प्रतिडाव डावांच्या उकली करून सर्वांघ घामाने भिजून गेले. अखेर श्रीपती खंचनाळे यांनी घुटना डावावर बत्तासिंगला चित करून हिंदुस्तानातील पहिला हिंदकेसरी होण्याचा सन्मान मिळवला.

राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्याकडून मानाची गदा व पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडून मानाचा फेटा मिळवला. अनेक देशी-परदेशी मल्लांना अस्मान दाखवण्याचा पराक्रम करणारे आणि जग गाजवणारे अनेक दर्जेदार मल्ल तयार करून  त्यांनी देशाचा झेंडा जागतिक पातळीवर फडकवला

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম