गावाचे नाव ‘भूत’; प्रत्येक घरासमोर थडगे

💀गावाचे नाव ‘भूत’; प्रत्येक घरासमोर थडगे 💀


Ⓜ 16 ड़िसेबर २०२० Ⓜ

फेसबुक लिंक http://bit.ly/386xOES
Ⓜ रांची : काही लोकांची आणि गावांचीही नावं अजब असतात. झारखंडमध्ये रांचीजवळच असलेल्या खुंटी (!) नावाच्या जिल्ह्यात असेच एक गाव आहे. या गावाचे नाव आहे ‘भूत’! या गावातील प्रत्येक घरासमोर थडगे आहे. त्यावर संबंधित मृताची तपशीलवार माहिती कोरून ठेवलेली आहे. गावाचे नावच भूत असल्याने अर्थातच गावकर्यांना बर्याच समस्यांना तोंड द्यावे लागते.mahitiseva

गावाचे नाव ‘भूत’; प्रत्येक घरासमोर थडगे

हे गाव शंभर वर्षांपूर्वी वसलेले आहे. पूर्वी गावाचे नाव ‘बुनहातू’ असे होते. मात्र, इंग्रजांनी ते ‘भूत’💀 असे ठेवले. इंग्रजांना म्हणे या गावात भुताटकीचा अनुभव आला होता. हे गाव डोंगर उतारावर वसलेले आहे. तिथे गावातीलच काही लोकांची थडगी आहेत.

वेगवेगळ्या सण-उत्सवात या थडग्यांची पूजा करण्याची भलतीच प्रथा इथे आहे.💀 गावाचे प्रमुख प्रेमचंद मुंडा यांनी सांगितले की, गावात अजूनही अनिष्ट कर्मकांड आणि अंधविश्वास कायम आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांना अनेक समस्या भेडसावतात.mahitiseva
मुलांच्या लग्नावेळीही अडचणी येतात. कोणतीही मुलगी ‘भूत’ गावात राहण्यास येण्यासाठी तयार होत नाही. अनेक सुना इथे येऊन माहेरी कायमच्याच परतल्या! @

┄┄┅┅━━⚀━━┅┅┄┄
● संकलन
📞@9890875498 ⒱9011714634
©माहिती सेवा गृप पेठवड़गाव 
▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম