ही आहे सर्वात सुंदर संन्यासी मुलगी
फेसबुक लिंक http://bit.ly/2KLDcWm
अल्प-वयातच काहीतरी अचंभित घडवून आणण्यात आज कुणीच मागे नाहीये. मुली सुद्धा नाही. आपल्या देशात सुद्धा खूप अश्या मुली आहेत ज्या अल्प-वयातच खूप काही महान कार्य करून गेल्यात. त्यातल्याच काही मुली कमी वयातच संन्याशी बनून जातात आणि देवाच्या पूजा-अर्चनेत आपला संपूर्ण वेळ घालवतात. आज मी तुम्हाला अश्याच एका मुलीबद्दल माहिती देणार आहोत जी ईश्वराच्या भक्तीत लीन असते आणि धर्मात आणि देवांवर विश्वास करते. कृष्णाच्या भक्तीत मग्न असते. एवढंच नव्हे तर ही मुलगी एक धार्मिक संगीत कलाकार सुद्धा आहे.तिचं नाव आहे जया किशोरी. अत्यंत हुशार आणि सुंदर व्यक्ती. त्यांचा जन्म १३ जुलै १९९६ रोजी राजस्थानच्या सुजानगढ शहरात झाला. लहानपणापासूनच किशोरींना कृष्णभक्तीची भारी आवड. बालपणापासूनच त्या कृष्णभक्तीत मग्न असायच्या. तासंतास रमत बसायच्या. त्यांना धार्मिक संगीतातही तितकीच आवड होती आणि याच आवडींची जोपासना करत त्यांनी कृष्णभक्तीचा मार्ग निवडला. आपल्या आयुष्यातलं सर्वस्व त्यागून त्यांनी सन्यास घेतला आणि ईश्वराच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केलं.जया किशोरींनी आपल्या ईश्वर भक्तीतून खूपच कमी वयात लोकांना पटवून दिलं कि चराचरात, आपल्या सभोवताल ईश्वराचं वास्तव्य आहे. कोणत्या न कोणत्या रूपातून तो आपल्या भक्तांवर-लेकरांवर लक्ष देत असतो. आज किशोरींच्या आवाजामुळे आणि सौंदर्यामुळे त्यांना आस्तिक लोकांचा आणि भक्तांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय.,त्यांचं आयुष्य म्हणजे आता दुसर्या मुलींसाठी एक प्रेरणास्थळच आहे. एवढ्या कमी वयात एवढं सगळं मिळविणे काही थट्टा नाही. आता किशोरी फक्त २२ वर्षांची आहे.कृष्णभक्तीसोबतच त्यांना माता सरस्वतीचीही तेवढीच आराधना केली. त्यांनी नुकतीच बी. कॉम. च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा पास केली आहे. एक ना अनेक गोष्टी आहेत जया किशोरींच्या ज्यांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Tags
माहिती