टीव्हीचा रिमोट आपटल्यानंतर कसा चालू होतो?
चॅनेल बदलायच्या वेळी अचानक टीव्हीचा हा रिमोट काम करणेच बंद करतो.मग आपण सर्व बटना दाबून बघतो तेरी देखील तो काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.हे आपल्या प्रत्येकाच्या घरात रोजच होत असतं.
रिमोटमध्ये लावण्यात येणाऱ्या बॅटऱ्या ह्या खूप वेळासाठी रिमोटमधेच असतात. कधीकधी वर्षभर देखील ह्या बॅटरी त्या रिमोटमध्ये असतात, ते आपण रिमोट किती वापरतो ह्यावर अवलंबून असते.खुप काळ ह्या बॅटरी रिमोटमध्ये राहिल्याने त्यांच्या टर्मिनल्स आणि बॅटरी मध्ये एक ऑक्सिडेशन लेयर तयार होते.
ऑक्साईड लेयर मुळे हाय रेझिस्टीविटी तयार होते जी करंट वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो.ज्यामुळे व्होल्टेज कमी होतो आणि रिमोट व्यवस्थितपणे काम करत नाही.ऑक्साईड लेयरमुळे करंट वाहून नेण्यात अडथळा येत असल्याने हा आपला रिमोट कधी कधी काम करत नाही. तसेच टीव्हीचा रिमोट हा खूप कमी उर्जा वापरतो.म्हणजे जेव्हा आपण रिमोटची बटण दाबतो तेव्हा एक लाल लाईट लागतो. तेवढीच उर्जा रिमोट वापरतो.,एवढ्या कमी उर्जेच्या दाबाचा ऑक्साईड लेयरवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे कधी कधी आपला रिमोट हा व्यवस्थितपणे काम करत नाही.टीव्ही रिमोटमध्ये खूप कमी करंटचा वापर होतो त्यामुळे ऑक्साईड लेयरच्या रेझिस्टन्सवर ह्याचा काहीही परिणाम होत नाही.रिमोट आपटल्याने रिमोटच्या आतील पार्ट्स हलतात. अश्याप्रकारे रिमोट आपटन्याला आपटण्याला एक नाव देखील आहे- Percussive Maintenance.तर ह्याचा साधा सरळ अर्थ असा की Percussive Maintenance ह्या शब्दाचा वापर ‘एखाद्या मशीनला खूप वेळा आपटून त्याने त्या मशीनमध्ये काही सुधार येतो का हे बघण्यासाठी केलेली क्रिया’ ह्यासाठी होतो.¶
Percussive Maintenance ह्याचा वापर फक्त रिमोटच नाही तर टोस्टर, कार बॅटीरिज आणि एवढचं नाही तर टीव्ही सारख्या मशीन्ससाठी देखील केला जातो.
अचानकपणे रिमोट आपटल्याने बॅटीरिज आणि टर्मिनल्समधील जो तुटलेला संपर्क आहे तो पुन्हा जोडला जातो. त्यामुळे आपटल्यानंतर रिमोट पुन्हा काम करू लागतो.कोरा लिंक http://bit.ly/3ssZyMd Anil patil यांनी दिलेले उत्तर
=======================================================
How does the TV remote turn on after hitting?
When the channel is changed, the TV remote suddenly stops working. Then we press all the buttons and it doesn't work, then we hit it two or three times and then it starts working remotely. This happens every day in each of our homes.
The batteries installed in the remote are in the remote for a long time. Sometimes these batteries are in the remote even throughout the year, it depends on how much you use the remote.
The oxide layer creates high resistance which hinders the conduction of current. This reduces the voltage and the remote does not work properly.
Your remote sometimes does not work as the oxide layer interferes with the conduction of current. Also the TV remote uses very little energy.
That is, when we press the button on the remote, a red light comes on. The same amount of energy is used by the remote. Such low energy pressure has no effect on the oxide layer. So sometimes your remote doesn't work properly.
The TV remote consumes very little current, so it has no effect on the resistance of the oxide layer. There is also a name for hitting a remote in this way - Percussive Maintenance. So the simple meaning is that the term Percussive Maintenance is used to refer to ‘the action taken to hit a machine several times to see if it improves the machine’.
Percussive Maintenance is used not only for remote but also for machines like toasters, car batteries and more.
A sudden contact with the remote reconnects the broken connection between the batteries and the terminals, so the remote starts working again after the hit.