महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत राहतो अधिक तरुण

⭕  महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत राहतो अधिक तरुण   ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव💢
____________________________
दि. ८ फेब्रुवारी २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/2YXw1hb
             वॉशिंग्टन : पुरुषांचा मेंदू महिलांच्या तुलनेत सरासरी तीन वर्षे आधीच वृद्ध होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मेंदूत होणार्‍या चयापचय क्रियेमधील अंतराच्या आधारे हे संशोधन केले आहे. या संशोधनात भारतीय वंशाचे संशोधक मनू गोयलही सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, मेंदू शर्करेच्या आधारेच काम करीत असतो. मात्र, वाढत्या वयाबरोबर मेंदूत शर्करेचा वापर करण्याच्या पद्धतीत बदल घडू लागतो.


╔══╗ 
║██║       ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज’ मध्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शर्करेचा एक हिस्सा ‘एयरोबिक ग्लायकोलिसिस’ (ऑक्सिजनच्या उपस्थितीत शर्करेचे विखंडन) प्रक्रियेत समाविष्ट होतो. हीच प्रक्रिया मेंदूचा विकास आणि पोषणासाठी जबाबदार असते. या संशोधनासाठी 20 ते 84 वर्षे वयोगटातील 121 महिला आणि 84 पुरुषांची पाहणी करण्यात आली. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* आम्ही त्यांच्या मेंदूतील ग्लुकोज म्हणजेच शर्करा आणि ऑक्सिजनच्या प्रवाहाला मोजण्यासाठी त्यांचे पीईटी स्कॅन केले. त्यानंतर वय आणि मेंदूतील क्रियांमधील संबंधांची माहिती घेण्यासाठी एका कॉम्प्युटरमध्ये पुरुषांचे वय आणि मेंदूतील क्रियांबाबतचा डेटा टाकला. महिलांच्या मेंदूच्या चयापचय क्रियांबाबतचा डेटाही त्यामध्ये अपलोड करण्यात आला. त्याचे जे निष्कर्ष आले त्यानुसार महिलांच्या वास्तविक वयापेक्षा त्यांचा मेंदू 3.8 वर्षांनी तरुण होता. पुरुषांचा मेंदू त्यांच्या खर्‍या वयाच्या तुलनेत केवळ 2.4 वर्षांनीच तरूण होता.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖    
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম