अर्जेंटिनातील ‘हस्तिनापुर’ शहर

  अर्जेंटिनातील  ‘हस्तिनापुर’ शहर  


दि. ८ फेब्रुवारी २०१९

फेसबुक लिंक http://bit.ly/3cQeC2b
             अर्जेंटिनामध्ये हस्तिनापुर शहर…? काहीसं ऐकायला विचित्र वाटतं ना?…अहो, पण हे अगदी खरं आहे. अर्जेंटिनाच्या परकीय भूमीवर आपल्या महाभारतातील हस्तिनापुर शहर अस्तित्वात आहे. पण हे शहर म्हणजे प्राचीन काळातील ओसाड नगरी वगैरे नाही.

अर्जेंटिनातील  ‘हस्तिनापुर’ शहर

हिंदू संस्कृतीपासून प्रेरित होऊन अर्जेंटिनावासियांनी एक शहर उभारले आहे आणि त्याला ‘हस्तिनापुर’ असे नाव दिले आहे.

तेथील रहिवाश्यांनी येथे मंदिरांमध्ये आणि मंदिराच्या आवारामध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींची स्थापना देखील केली आहे. १२ एकर मध्ये पसरलेल्या या शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त देवाधीकांच्या मुर्त्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
शहराला भेट द्यायला येणाऱ्यांमध्ये लॅटीन अमेरिकन आणि हिंदू धर्मीयांची रेलचेल असते. हे शहर सुगंधी वनस्पतींसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि शहरात पाउल टाकल्यापासून ते शहर सोडेपर्यंत तो सुवास आपली पाठ काही सोडत नाही.
या सुवासासोबतच सगळीकडे विविध सुगंधाच्या अगरबत्त्यांचा देखील सुवास दरवळत असतो. त्यामुळे येथील वातावरण चैतन्यपूर्ण आणि मोहक भासते.   भगवान शंकर, श्री गणपती, महाविष्णू आणि सूर्य देवांच्या मूर्ती जरा जास्त प्रमाणात आढळतात. अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे येथे पाच पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांच्या देखील मुर्त्या आहेत. अहो शेवटी ज्यांच्या राज्याची ही राजधानी त्यांनाच मान दिला नाही तर कसा चालेल.मुख्य मंदिरातील वातावरण हे कोण्याही हिंदू भक्ताचं मन प्रसन्न करणारं आहे. मंदिरात नेहमी भजन-कीर्तन सुरु असते. टाळ मृदुंगाचा, अभंगाचा आवाज कानी घुमत असतो. भक्तांची तर सारखी रीघ सुरु असते. डोळे मिटून देवासमोर उभे राहून आपली गाऱ्हाणी मांडणाऱ्या भाविकांमध्ये हिंदूंसोबतच लॅटीन अमेरिकनही असतात आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,हे शहर आसपासच्या परिसरात ज्ञान भांडार म्हणून प्रसिद्ध आहे. कारण हिंदू संस्कृतीतील अमुल्य ग्रंथ आणि इतर अनेक विषयांवरची पुस्तके आपल्यात साठवून एक भलेमोठे ग्रंथालय येथे उभे आहे. दर आठवड्याला १२ स्थानिक लोक एकत्र जमून मंदिरांची आणि शहराची साफसफाई करतात. कधी कधी तर फिरायला आलेले पर्यटक देखील या चांगल्या कार्यात हातभार लावतात.
विदेशातील या हस्तिनापुर शहराची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे, या शहरामध्ये कोणीही धर्मगुरू नाही आहे. येथे कोणावरही धर्म लादला जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्मकांड येथे होत नाही.
अजून एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे येथे गणेश चतुर्थी, बैसाखी आणि कित्येक प्रसिद्ध हिंदू सण उत्साहाने साजरे केले जातात. या हस्तिनापुर शहरामध्ये योगा विषयात पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी विकेंडला वर्ग भरवले जातात.
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष लागतात. हस्तिनापुर मध्ये सध्या जवळपास २५०० विद्यार्थी योग आणि अध्यात्माचे शिक्षण घेत आहेत.
हस्तिनापुर फाउंडेशनची स्थापना अडा अल्ब्रेक्ट यांनी १९८१ रोजी केली. त्यांनी अर्जेंटिनाच्या लोकांना भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली. ‘भारतातील संत आणि त्यांची शिकवण’ आणि ‘हिमालयातील भिक्षूंची शिकवण’ यांसारखी दर्जेदार पुस्तके त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरली आहेत.
इनमराठी वरून साभार
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম