इन्सुलिनसाठी इंजेक्शन नव्हे तर कॅप्सूल!

 इन्सुलिनसाठी इंजेक्शन नव्हे तर कॅप्सूल !    


दि. १० फेब्रुवारी २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2MTO6tU
            स्विडनच्या संशोधकांनी मधुमेहाच्या रुग्णांना वेदनारहित मार्गाने इन्सुलिन मिळावे, यासाठी मायक्रोनिडल पॅच विकसित केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता अमेरिकेतील संशोधकांनी याच हेतूने कॅप्सूल विकसित केले आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिनसाठी वारंवार इंजेक्शन घ्यावे लागतात. मधुमेहाशिवाय कर्करोग आणि अन्यही काही गंभीर आजारांमध्ये रुग्णांना इंजेक्शनच्या माध्यमातूनच औषधे घ्यावी लागतात.

इन्सुलिनसाठी इंजेक्शन नव्हे तर कॅप्सूल !


त्यामुळे सतत त्यांना वेदनांना सामोरे जावे लागते. शिवाय, ही औषधे इतक्या मोठ्या अणूंपासून बनलेली असतात की, रुग्णाचे आतडे ती पचवू शकत नाहीत. त्यामुळे यावर प्रभावी उपाय शोधण्याचा प्रयत्न दीर्घकाळापासून केला जात होता. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांना इंजेक्शनशिवायच इन्सुलिनसारखे औषध देण्याचा प्रयत्न होता. आता या प्रयत्नात संशोधकांना हे मोठे यश मिळाले आहे.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक असे रोबोटिक कॅप्सूल बनवले आहे ज्याच्या मदतीने रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन सहजपणे जाऊन पोहोचू शकते. या कॅप्सूलमध्ये कासवाच्या पाठीच्या आकाराचे ‘सोमा’ नावाचे सूक्ष्म उपकरण ठेवले आहे. त्यामध्ये इन्सुलिन किंवा अन्यही औषधे ठेवता येतात. पोटात पोहोचताच सोमामधील औषध शरीरात सोडले जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यानंतर हे सूक्ष्म उपकरण विष्ठेतून बाहेर पडते. पोटात जाताच योग्य दिशेला ते वळावे आणि औषध कोणत्याही समस्येशिवाय सोडता यावे, यासाठी या उपकरणाला कासवाच्या पाठीसारखा आकार देण्यात आला आहे. सध्या या उपकरणाचा यशस्वी प्रयोग उंदीर आणि डुकरांवर करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांच्या काळात माणसावरही त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या  जातील.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম