एेतिहासिक मंगळवेढा

  

   एेतिहासिक मंगळवेढा 



फेसबुक लिंक http://bit.ly/2ZaIBcW
सोलापूर पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण आहे.चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत.मंगळवेढा प्राचीन काळी महामंडलेश्वर, मंगलवेष्टक अशा नावांनी प्रसिद्ध होते.मंगळवेढ्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत पोचतो. दक्षिण भारतातील चालुक्य/राष्ट्रकुट यांच्या काळात भरभराटीला आलेले ते शहर. ते नंतर देवगिरीच्या यादवांकडे आले. तेथे बहामनी राजवट इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुरू झाली. राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी कलचुरी, त्यांच्या राज्यात मंगळवेढे हे राजधानीचे शहर होते. वीरशैव पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड, तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी असल्याचे उल्लेख आलेले आहेत.नंतर, 1489 साली ते गेले विजापूरच्या आदिलशहाकडे. आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ आहे. इसवीसन १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला.

 हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५ मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात घेतला.मोगलांनी विजापूरची आदिलशाही १६८६ साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले.मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आणि माचणूर किल्ला भीमेच्या काठी आहे. याठिकाणी इसवीसन १६९५ ते १६९९ औरंगजेबाचा मुक्काम होता.त्यावेळी औरंगजेब मंगळवेढे येथील जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे.औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे.

 त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात.राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख आहेत. 

शिवरायांचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात झाल्याची दाखवणारी एकमेव नोंद मंगळवेढे येथेच आहे. शिवरायांचा मुक्काम तेथील भुईकोट किल्ल्यात 18 नोव्हेंबर 1665 या दिवशी होता.


एेतिहासिक मंगळवेढा
एेतिहासिक मंगळवेढा
            
मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू.पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्ती नंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत आहेत. किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत.यादवोत्तर काळात हे मंदीर मोडकळीस आले होते. पुढे मुसलमानी राजवटीत विजापूरच्या गादीवर आल्ली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी शके १४९४, इ.स. १५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा आहे विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्‍या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
========================
 *‼मंगळवेढा किल्ला  ‼*
=======================
 मंगळवेढा गावात शिरताच ‘कचेरी कुठाय? कचेरी कुठाय?’ ‘कुठाय कचेरी?’ असं विचारत गेलं तरी आपण मंगळवेढा किल्ल्यात आरामात जावून पोहोचतो.. सध्या या किल्ल्यात तलाठी कचेरी, पोलीस चौकी आणि पोर्टेबल तुरुंग आहे.. किल्ल्याचा तट जरी मजबूत असला तरी दुमजली बुरुज ढासळला आहे.. तटबंदी च्या आतून बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. इथे पोहोचलो तरी भल्या मोठ्या वृक्षवल्लीने हा किल्ला वेढल्याचे दिसले.. चिंच, वड आणि कडूनिंब या झाडांच्या भाऊगर्दीने इथे एक थंडावा निर्माण झाला आहे.. किल्ल्यात प्रवेश केला आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला.. कांडी करकोचा, खंड्याचे दर्शन घडले.. पुढे पोलीस चौकी जवळ च्या झाडाखाली उभं राहिलो तर घुबडांचा घुत्कार ऐकू आला.. मान वर करून पहिले तर दोन घुबडे पाहायला मिळाली.. त्यातलं एक घुबड शिंघम कडे डोळे वटारून ‘टकमका टकमका’ पाहत होतं.. 
किल्ल्याविषयी सांगायचं झालं तर बिदरच्या राजाने हा किल्ला बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. एकूण सात बुरुजांच्या ह्या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे.. सध्या या किल्ल्यातील बालेकिल्ला म्हणजे चौबुर्जी.. हा चार बुरुजांचा कोट तेवढा धडधाकट असा उभा आहे.. किल्ल्यावर फेरफटका मारला तर काही पोर्टेबल तुरुंगासमोरील मोकळ्या जागेत काही जैन देवतांच्या मूर्ती आणि एक विश्वेश्वराचा मुखवटा नजरेस पडतो..
*▪माचनूर किल्ला* : मंगळवेढा किल्ला आणि त्यात अचानक, अनपेक्षित घडलेलं पक्षी निरीक्षण (Bird Warching) उरकून माचनूर कडे निघालो.. मंगळवेढा ते माचनूर असा १०-१२ कि.मी. चा प्रवास उरकून सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्याने पुढे निघालो.. माचनूर च्या किल्ल्या जवळील गावात लाजवंती पार्क केली आणि तडक किल्ल्याकडे निघालो.. हागणदारी तून वाट काढत.. किल्ल्याच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचलो.. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा एक आडवी भिंत घालून लपवलेला आहे.. तटबंदी फारशी उंच नाही जेमतेम १५-२० फुट पण अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला.. आणि पहिले तर क्रिकेटचे मैदान.. गावकऱ्यांनी किल्ल्यात एक अवशेष शिल्लक ठेवला नाही.. नुसते वाड्याचे चौथरे नजरेस पडतात..
जेंव्हा औरंगजेबाने आदिलशाही नेस्तनाबूत करण्याची मोहीम उघडली त्यावेळी या किल्ल्यावर मुक्काम केल्याचे इतिहासकार सांगतात.. दरवाजातून समोर पहिले असता चंद्रभागा नदीचे दर्शन होते तिकडे डाव्या कोपरयात.. एक पांढऱ्या रंगाने रंगवलेली एक मंदिरासारखी वास्तू नजरेस पडते.. तिकडे निघालो..आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या वास्तूच्या मागच्या बाजूस भीमा नदी वाहते आणि डावीकडे सिद्धेश्वर मंदिराचा घाट आणि पाण्यात एखाद्या बेटासारखे दिसणारे शिवमंदिर नजरेस पडते.. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे.. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते.. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिक दृष्ट्या उत्तम आहे..  किल्ल्याची नदीकाठची तटबंदी पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे.. किल्ल्याचा पसारा तसा बऱ्यापैकी मोठा आहे.. पण ‘बाहेरून चकचकाट आणि आत भुइसपाट’ अशी अवस्था आज या किल्ल्याची झाली आहे..
इथे पोहोचलो तो आभाळ झाकोळलं होतं.. आणि नदीचा परसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेलं होता.. इथे सिंघम ला पाण्याला समांतर उडणाऱ्या काही टिटव्या, बाभळीच्या झाडावर बसलेला खंड्या.. देसी हमिंग बर्ड चे दर्शन झाले.. तिकडे खाली एका खोपाड्यात.. काहीतरी जाताना दिसलं.. पण ते उदमांजर होतं का घोरपड की मुंगुस यावर कुणाचंच एकमत झालं नाही .. शेवटी काहीतरी दिसलं असं डिक्लेअर करून पुन्हा मुख्य दरवाजाशी येवून पोहोचलो.. दरवाजासमोर जंगी फोटोसेशन उरकून सिद्धेश्वर मंदिराकडे निघालो..
*▪माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर आणि बेगमपूर दर्गा*
माचनूर चे सिद्धेश्वर मंदिर हेमाडपंती असून त्याला चार बाजूने कोट चढविला आहे.. या शिवाय नदीकडे उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचा घाट बांधला आहे.. या पायऱ्या उतरलं कि आपण.. बेटासारख्या दिसणाऱ्या शिवमंदिराच्या पुढ्यात येवून पोहोचतो.. या घाटाच्या कठड्याकडे निट पाहिल्यास त्यावर व्याघ्र प्रतिमा कोरल्याचे दिसून येते..
https://m.facebook.com/story.php?story_fbid=244905142574083&id=100011637976439
 सिद्धेश्वर मंदिरातील नंदी हा देखील बघण्यासारखा आहे.. शंकराकडे तिरपी नजर टाकणारा पितळेची शिंगे असलेला हा नंदी खासंच आहे.. सिद्धेश्वराचे दर्शन घेवून सोलापूरकडे निघालो.. इथून जवळच बेगमपूर चा दर्गा आहे.. बेगमपूर इथे नदी काठी औरंगजेबाच्या एका मुलीचे थडगे आहे.. यावर बरेच कोरीव काम केल्याचे दिसते..  पुरातत्व खात्याने सध्या इथली इमारत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे..♍ 
➖➖➖➖➖➖➖ ➖➖

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম