आपला मेंदू असतो इतक्या जीबीचा


आपला मेंदू असतो इतक्या जीबीचा


फेसबुक लिंक http://bit.ly/3uxj3oZ        

 आपण मोबाईल घेताना नेहमी मेमरी स्टोरेज किती जीबी आहे? हे पाहतो. त्यावरुन ठरवतो घ्यायचा की नाही. पण तरीही ती मेमरी कमीच पडते. आपण मग कॉम्प्युटरवर मेमरीचा बॅकअप घेतो. जास्त क्षमता असलेले मेमरी कार्ड घतो. मात्र, जन्मापासून घडणाऱ्या सर्व घटना मेंदू आपल्या लक्षात ठेवतो. त्याची मेमरी किती आहे माहिती आहे का? जाणून घेऊयात आपल्या मेंदूची क्षमता...

आपला मेंदू असतो इतक्या जीबीचा

मेंदूची क्षमता असते अंदाजे 2.5 पेटाबाईट. 1 पेटाबाईट म्हणजे 1000 टेराबाईट. 1 टेरा बाईट 1000 जीबी. म्हणजे 16 जीबीची मेमरी असलेले 1 लाख 56 हजार फोन!  मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात 38 हजार ऑपरेशन करू शकतो.
 यातून हे, स्पष्ट होती, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या  एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये 10000 कोटी मज्जापेशी (न्युरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणार्या तार्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त  एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला 3171 वर्षे लागतील!  एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे 1000 कि.मी. एवढी होईल. पण, न्युरॉन्सची रुंदी फक्त 10 मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
-----------------

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম