अॅम्बुलन्स वाहनावर "ɐɯnןɐuɔǝ" ऊलट अक्षरात का लिहिलेले असते?
______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
तुम्ही बरयाच वेळा पाहिले असेल की, रस्त्याने रूग्णवाहिका सायरन वाजवत जात असते त्यावेळी तिच्या पुढील बाजुवर "AMBULANCE" ही इंग्लिश अक्षरे ऊलटी लिहिलेली असतात. ɐɯnןɐuɔǝ जेव्हा रुग्णवाहिका गंभीर आजारी रूग्णांना रुग्णालयात नेत असताना वेगाने पुढे जात असते.जेणेकरुन रुग्णाला वेळेवर उपचार मिळावे.जेंव्हा रूग्ण घेवून रुग्णवाहिका रस्त्याने निघते, रुग्णवाहिकेला आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीचे नियम पाळण्याची आवश्यकता नसते कारण रुग्णाला वेळेवर रुग्णालयात नेणे असते जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल.तेव्हा"AMBULANCE"च्या पुढे असलेल्या गाडीतील चालकाला त्याच्या गाडीच्या आरशात ते नाव “सुलट” दिसून त्याने "AMBULANCE" ला वाट करून द्यावी म्हणून रुग्णवाहिकेवरील (अॅम्बुलन्स) नाव उलट का लिहिलेले असते.
Tags
जनरल नॉलेज