विमानाच्या काचा गोल का असतात ?
✈
✈
✈
✈
우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우
🌹तारीख 20 मार्च 2021 🌺
फेसबुक लिंक http://bit.ly/3shkJl3
आपण अनेकवेळा प्रवासाला निघताना बस, रेल्वेचा वापर केला असले. मात्र खिडकीच्या काचा या चौकनी पाहिल्या असतील. मात्र, विमानाच्या काचा चौकनी का नाही, असा कधी प्रश्न तुमच्या मनात तरी आला आहे का?आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. या विमान नावाच्या यंत्राने जगात जन्म घेतल्यापासून सामान्य मनुष्याच्या समोर अनेक प्रश्नांचंजाळं उभं केलंय. लहाना पासून थोरांपर्यंत प्रत्येकजण विमानाविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधात असतो. अश्याच बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे विमानाच्या काचा गोल का असतात? ज्यांनी विमानातून प्रवास केला आहेत त्यांना देखील विमानात बसल्यावर हा प्रश्न नक्की पडला असणारं. चला तर मग आज जाणून घेऊ या विचित्र प्रश्नामागचं शास्त्रीय उत्तर!
हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की विमानाच्या काचा या काही पहिल्यापासून गोल नाहीत. पूर्वी या काचा चौकोनी आकाराच्या होत्या. परंतु बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या.‘हेवीलँड कॉमेट’ या प्रसिद्ध विमानाच्या १९५० मध्ये शोध लागला. त्याकाळचे सर्वात सुपर फास्ट विमान म्हणून या विमानाचा नावलौकिक होता.प्रवाशी क्षमतेबाबही हे विमान इतर विमानांच्या तुलनेने सरस होते. विमान निर्मात्यांनी सर्व काही योग्य रीतीने केले होते पण त्यांच्याकडून एकच चूक झाली ती म्हणजे त्यांनी विमानाला चौकोनी काचा बसवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की १९५३ मध्ये ‘हेवीलँड कॉमेट’ प्रकारची दोन विमाने आकाशातून थेट खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये जवळपास ५६ प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.स्रोततपासा अंती असे निष्पन्न झाले की, विमानच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला. हवेच्या अति दाबासमोर काचा तगधरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या परिणामी विमान खाली कोसळले.या घटनेनंतर होणारे अपघात टाळण्यासाठी गोल काचांचा पर्याय पुढे आला. या गोल काचांना कोपरे नसल्याकारणाने काचेवर हवेचा दाब निर्माण होत नाही आणि काचा फुटायची शक्यता नसते.
___________^____________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
______________________
✆ ⑨⑧⑨0⑧⑦⑤④⑨⑧
_________💞__________
Tags
जनरल नॉलेज