हे आहेत बिनभांड़वली किवा अल्प भांड़वली व्यवसाय
1) पैशांचे भांडवल
2) वेळेचे भांडवल
3) मनुष्यबळाचे भांडवल
अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्धनसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो. तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये मुल्याचा वेळ उपलब्ध असतो.मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो
या व्यवसायात माणसे चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. हे व्यवसाय कोणते हे थोडक्यात बघू.
1) विमा प्रतिनिधीः-भारतामधेविमा व्यवसाय हा अत्यंत वेगाने वाढणार्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. यामधेआयुर्विमा (LifeInsurance) वसर्वसाधारण विमा (GeneralInsurance) हेदोन प्रकार येतात.आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे स्पर्धावाढली आहे. आता सर्वच विमा कंपन्यांना उच्च दर्जाच्या विमा प्रतिनिधींची गरज आहे.
2) म्युच्युअल फंड सल्लागारः-म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवीनसाधन उपलब्ध झाले असून, हा पण व्यवसायप्रचंड वेगाने वाढतो आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड सल्लागारांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे
.3) विक्री प्रतिनिधीः-हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री दुकानदारांमार्फत न करताविक्री प्रतिनिधींमार्फत करतात. विशेषतः आरोग्यविषयक उत्पादने करणार्या कंपन्याहा मार्ग अनुसरतात
.4) सामुपदेशक (Councilors):-मोठ्या प्रमाणावर यांची गरज आहे.
5) प्रशिक्षक (Trainer) :-हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना प्रशिक्षकांची गरज भासते. शिक्षक (Teacher) व प्रशिक्षक (Trainer) यात मोठा फरक आहे. प्रशिक्षक हा त्या क्षेत्रातील तज्ञ असावा लागतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा प्रशिक्षक होऊ शकेल पण तो हुतुतु, खोखो, आट्यापाट्या या खेळांचा प्रशिक्षक होऊ शकणार नाही पण शिक्षक होऊ शकेल
6) सल्लागार (Consultants):-हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना सल्लागारांची गरज भासते.असे अजुन पुष्कळ व्यवसाय आहेत.सर्वसाधारणपणे ग्रामीण भागासाठी 10 वी पास व शहरी भागासाठी 12 वी पास असलेले व 18 च्या वर वय असलेले कोणीहीस्त्री-पुरुष हा व्यवसाय करू शकतात. काही व्यवसायांमधे वयाची व शिक्षणाची अट नसते, तसेच अनुभवाची गरज नसते.