येथे शिवलिंग रूपात होते देवी पार्वतीची पूजा, होतो 'असा' अनोखा चमत्कार...

⭕. येथे शिवलिंग रूपात होते देवी पार्वतीची पूजा, होतो 'असा' अनोखा चमत्कार... ⭕
_____________________________
    ⭕ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ⭕
_____________________________
       _दि. ४ मार्च. २०२०_
•═════• ⭕ •═════•   

फेसबुक लिंक http://bit.ly/3rh7sbl         

❏ भारतामध्ये अशी अनेक मंदिर आहेत त्यांच्या चमत्कारांचा उलगडा अजून संशोधकांना देखील झाला नाही.पाहूया अश्याच एका मंदिराबद्दल.हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हटले जाते. या ठिकाणी अनेक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहेत. तुम्हाला माहित आहे का कांगडा जिल्ह्यात एक अनोखे शिवलिंग असून येथील कंठगढ महादेव पाणीदार अर्धनारीश्वर रूपातील शिवलिंग आहे.यासोबतच शिव-पार्वती रूपात असलेल्या दोन्ही शिवलिंगांमधील अंतर आपोआप कमी-जास्त होत राहते.

╔══╗
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
हे जगातील एकमेव असे मंदिर आहे, जेथे शिवलिंग दोन भागांमध्ये विभागलेले आहे. देवी पार्वती आणि महादेवाच्या दोन विभिन्न रूपाची पूजा या एका शिवलिंगातच होते.तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही कि,ग्रीष्म ऋतूमध्ये हे स्वरूप दोन भागांमध्ये विभागले जाते आणि शीत ऋतूमध्ये पुन्हा एकरूप होते. विशेष म्हणजे शिवरात्रीला शिगलिंगाचे हे दोन्ही भाग एकरूप होतात.
येथील शिवलिंग काळ्या-भुरकट रंगाचे आहे. शिव रूपात पूजन करण्यात येणाऱ्या शिवलिंगाची उंची 7-8 फूट असून देवी पार्वती रूपात असलेल्या शिवलिंगाची उंची 5-6 फूट आहे.


शिव आणि शक्तीच्या अर्धनारीश्वर स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी येथे लाखोंच्या संख्येने भक्त येतात. या व्यतिरिक्त श्रावण महिन्यात येथे भक्तांची खूप गर्दी राहते.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
_*✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*_
-----------------

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম