रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाच्या मागे देखील लपलेला आहे एक अर्थ !

  रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाच्या मागे देखील लपलेला आहे एक अर्थ !       

    
तारीख  15 मार्च 2021   

फेसबुक लिंक http://bit.ly/2OX44nJ

रेल्वेने प्रवास करताना तुमचे रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाकडे तुमचे कधीना कधी लक्ष गेले असेलच आणि तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की प्रत्येक रेल्वे डब्ब्यावर वेगवेगळे क्रमांक असतात. आता क्रमांकामागे काय अर्थ लपलाय?आता आपण जे छायाचित्र पाहतोय त्यावर आपल्याला ९८३३७ हा क्रमांक दिसतोय. हा क्रमांक त्या रेल्वे कोच(डबा) ची माहिती देतो ज्यावर हा नंबर लिहिलाय.पहिले दोन क्रमांक हे दर्शवतात की या या डब्ब्याची निर्मिती कधी केली गेली? आता वरच्या क्रमांकाकडे लक्षदिल्यास आपल्या लक्षात येईल की त्याचे पाहिले दोन क्रमांक हे ९८ हेआहेत म्हणजे १९९८ रोजी हा डब्बा तयार करण्यात आला.
पण त्या शेवटच्या तीन क्रमांकांबद्दल काय? ते तीन क्रमांक काय दर्शवतात? त्यासाठी खाली दिलेली यादी पहा. ____________________ 

००१-०२५  : एसी फर्स्ट क्लास, NER (उत्तर पूर्व रेल्वे) मध्ये काही डब्बे हे २०००/२००१ सालापासून बनवण्यास सुरुवात झाली.

०२६-०५०: संयुक्त 1AC +AC-2T०५१-१०० : 1AC१०१-१५०  : AC-3T१५१-२०० : CC (एसी चेअर कार)२०१-४००  : SL (सेकंड क्लास स्लीपर)४०१-६०० : GS ((जनरल सेकंड क्लास)६०१-७०० : 2S (सेकंड क्लास सिटींग/ जनशताब्दी चेअर कार्स)७०१-८००  : SLR८०१ +       : पॅन्ट्री कार, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार, VPU इत्यादी.आता वरच्या ९८३३७ क्रमांकामध्ये शेवटचे ३ क्रमांक आहेत- ३३७हा क्रमांक २०१-४०० : SL (सेकंड क्लास स्लीपर) या श्रेणीमध्ये मोडतो. आता पूर्ण ९८३३७ या क्रमांकाचा अर्थ लावायचा झाल्यास- १९९८ साली तयार झालेला हा सेकंड क्लास स्लीपर क्लास चा ३७ वा डब्बा आहे. 

रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांक

____________________ 

अजूनही गोंधळलेले आहात? चला अजून एक उदाहरण घेऊ. छायाचित्रातील रेल्वे डब्ब्यावर आपल्याला ०३२३० हा क्रमांक दिसतोय. या क्रमांकाचा अर्थ असा की २००३ साली तयार झालेला हा सेकंड क्लास स्लीपर क्लास चा ३० वा डब्बा आहे. (सोबत फोटो पहा)


___________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম