भारतात का असतात तीन पातींचे पंखे ?
•═════• ⭕ •═════•
फेसबुक लिंक http://bit.ly/3tiHapR भारतात उन्हाळा ऋुतु जबरदस्त असतो, मार्च पासुन चालु होणारा उन्हाळा जुनच्या मध्यापर्यंत असतो.एप्रिल मध्ये तर वैशाखात तर अंगाची लाहीलाही होते.यासाठी गरीबापासुन श्रींमतापर्यन्त पंख्याचा वापर करतात.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंखा हे घरातील सर्वात उपयोगी साधन असते.कारण या काळामध्ये प्रत्येकालाच त्याची गरज भासते.पण आपण कधी पाहिले आहे का, की आपल्या येथील पंख्याला तीनच पाती असतात ते? हे आपण रोजच पाहत असतो; पण त्यामागचे कारण आपल्याला ठाऊक नसते. भारतात ९९ टक्के सिलिंग फॅन हे तीन पात्यांचेच असतात. परदेशात मात्र पंख्यांची पाती चार असतात. याचे कारण का हे अनेकांना ठाऊक नसते.
पंख्यांची पाती एका निश्चित कोनात वाकलेली असतात आणि ती हवा देण्याचे काम करतात. मात्र, तीन पात्यांचा पंखा अधिक हवा देतो की चार पात्यांचा हे पाहणे गरजेचे आहे. आपणास माहित आहेच की परदेशात बरयाच ठिकाणी कायम बर्फ पडत असतो त्यामुळे तिथे भारतासारखा कडक उन्हाळा नसतो. परदेशात चार पात्यांचे पंखे हे बहुतांशी एअर कंडिशनरला पूरक म्हणून (सप्लिमेंट) वापरले जातात.भारतामधील लोकांचा पंखा लावायचा हेतू हा हवा मिळवणे हा असतो. कारण भारतातील सर्वच कुटुंब काही घरामध्ये ए.सी. लावू शकत नाहीत. अमेरिकन लोकांचा उद्देश एसीची हवा संपूर्ण खोलीत पसरावी हा असतो. हे चार पात्यांचे पंखे अतिशय सावकाश फिरत असतात.अमेरिकेतील लोकांना पंख्याची जास्त गरज भासत नाही. चार पातींचा पंखा हा रुममध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. या चार पातीचा पंख विदेशामध्ये जास्त वापरला जातो. त्यामुळे तसे पंखे जर भारतासारख्या उष्ण देशात वापरले तर ते अजिबात चालणार नाही.
भारतामध्ये तीन पातींच्या पंख्याचा जास्त वापर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पंखा खूप आरामदायक असतो. तसेच सर्वाच घरांमध्ये ए.सी लावू शकत नाही. तीन पाती असलेले पंखे चार पाती असलेल्या पंख्या पेक्षा अधिक हलके असतात आणि जलद गतीने फिरतात. त्यामुळे भारतातील लोक तीन पाती असलेल्या पंख्यांचा वापर करतात. कंपन्याही या सर्व गोष्टींचा विचार करून तीन पातीच्या पंख्याचे उत्पादन करत असतात.
------------------------------------------
Tags
जनरल नॉलेज