यांच्या’ लग्नात नवरा-नवरीला पाजली जाते 🍷दारू नवल,


                          

 ‘यांच्या’ लग्नात नवरा-नवरीला पाजली जाते  दारू 

       दि. २१ मार्च. २०२१
•═════• ⭕ •═════•   

फेसबुक लिंक http://bit.ly/3f7UJEC         

❏ लग्न म्हणजे दोन घरांना जोडणारा सोहळा. पारंपारिक रितीरिवाज, वेगवेगळ्या प्रकारच्या विधींनी दोन घरांना जोडणारा हा सोहळा पूर्ण होत असतो. हिंदुस्थानसारख्या विशाल देशात तर प्रत्येक भागात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा आणि रिती रिवाज आहेत.पण छत्तीसगडमधल्या एका आदिवासी समाजात तर लग्नामध्ये नवरा-नवरीला दारु 🍷पाजण्याची पद्धत आहे.

यांच्या’ लग्नात नवरा-नवरीला पाजली जाते  दारू


छत्तीसगडमधल्या कवर्धा जिल्ह्यातल्या बैगा या आदिवासी जमातीमध्ये ही प्रथा आहे. या समाजात लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरा मुलगा वरात घेऊन येतो त्यावेळी मुलीची आई मुलाला दारु पाजते. त्यानंतर ही दारु मुलीलाही पाजण्यात येते. तसेच संपूर्ण गावातही वाटली जाते. विशेष म्हणजे दारू पार्टी करूनही त्यांच्या लग्नाचा खर्च फक्त २२ रुपये होतो.बैगा समाजाच्या लग्न सोहळ्यात भटजी नसतो. यांच्यात लग्नाचा मंडप झाडांच्या पानांनी सजवलेला असतो. या समाजात लग्नाप्रमाणे दुख:तही दारू पाजली जाते.🍷
------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
❗-----------------

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম