________________________________
❗💊 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 💊❗
________________________________
_दि. २१ मार्च. २०२१_
•═════• ⭕ •═════•
फेसबुक लिंक http://bit.ly/3sju5g9
❏ 💊अमेरिकेत वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी आता चक्क पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळीविकसित केली आहे. शंभर पुरुषांवर या गोळीची यशस्वी चाचणीही करण्यात आली असून ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे त्यांनीम्हटले आहे. ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीप्रमाणेच आहे. आता पुरुषही रोज एक गोळी खाऊन गर्भनिरोध करू शकतील, असेत्यांनी म्हटले आहे.💊
╔══╗
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
❗माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
💊खास पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या तोंडावाटे खाण्याच्या गर्भनिरोधक गोळीचे नाव *‘डिमेथॅनड्रोलोन अनडिकॅनोट’ (डीएमएयू)* असे आहे. या गोळीत टेस्टॉस्टेरॉनप्रमकाणेच पुरुष हार्मोन अँड्रोजन आणि प्रोजेस्टाईनची एकत्र क्रियाअसते. वॉशिंग्टन विद्यापीठातील स्टेफनी पेज यांनी हे संशोधन केले आहे. शिकागो येथे झालेल्या एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक सभेत प्रा. पेज यांनी हे संशोधन मांडले. 18 ते 50 वर्षे वयोगटातल्या पुरुषांवर या गोळीची चाचणी घेण्यात आली. पेज यांनी सांगितले, ‘पुरुषांसाठी याआधी अनेक प्रकारचे इंजेक्शन तसेच जेल विकसित केले गेले; पण त्यापेक्षा ही गोळी एक चांगला पर्याय असल्याचे बहुतांश पुरुषांचे म्हणणे आहे.’ गर्भनिरोधकांच्या क्षेत्रात ही गोळी म्हणजे एक मोठे पाऊल ठरू शकते, असेही म्हटले जात आहे.
------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
❗-----------------
Tags
आरोग्य