फेसबुक लिंक http://bit.ly/3l21Ak1
❏ कॅमेरा, स्क्रिन आणि त्याचा रॅम किती आहे हे लक्षात घेवून मोबाईल खरेदी केला जातो. पण, जस-जसे मोबाईल आपली गरज बनतो तसे आपण त्याच्या बॅटरी संदर्भात अधिक जागरूक रहायला लागतो. थोडे जरी चार्जिंग कमी असले तरी त्याला लगेच चार्जिंग लावले जाते. लोकांचे मोबाईल वेड पाहता काही अफवा पसरवल्या गेल्या आहेत. त्या अफवांवर विश्वास ठेवून तुम्ही मोबाईलची अधिक काळजी घ्यायला लागता. आज आपण अशाच काही व्हायरल होणाऱ्या अफवांमागील वास्तव नक्की काय आहे याची माहिती घेवू.
🔹चार्जिंगला लावला असताना त्यावर बोलणे किंवा फोनचा वापर करणे हे धोकादायक असल्याचे तुम्ही ऐकले असेल. फोन गरम होवून स्फोट होण्याची शक्यता असते असेही म्हणतात. पण, ही एक अफवा आहे. तुम्ही असे केल्यास फक्त फोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला धोका असतो.
🔹काही लोकांना मोबाईलमध्येअनेक ॲप्स भरून ठेवण्याची आवड असते. त्याचा रोजच्या दैनंदीन जीवनात काहीही उपयोग नसला तरी मोबाईल भरलेला असावा म्हणूनही काही लोक ॲप्स डाऊनलोड करून ठेवतात. अशा लोकांना मोबाईलची बॅटरी लवकर संपण्याची भिती वाटते. तुमच्या मोबाईलमध्ये जास्त ॲप्स असतील तर बॅटरी लवकर संपतनाही. तर तुम्ही त्या ॲपचा किती वापर करता यावर मोबाईलची बॅटरी कितीवेळ टिकेल हे अवलंबून असते.
𓅂
🔹३ जी नेटवर्कपेक्षा ४ जीमध्ये अधिक बॅटरी अशीही एक अफवा आहे. पण, खरी परिस्थिती अशी नसून जर तुमच्या मोबाईलमध्ये ३जी आणि ४जी नेटवर्कची सिग्नल क्वालिटी जर सेमच असेल तर बॅटरी एकाच स्तरावर संपेल.
𓅂
🔹लॅपटॉपवरून जर तुम्ही मोबाईल चार्ज केला तर ती बॅटरीअधिक काळ टिकत नाही. पण, खरी गोष्ट अशी आहे की, चार्जरने मोबाईल चार्ज केला तर तो लवकर चार्ज होतो आणि लॅपटॉपने मोबाईल चार्ज होण्यास उशीर होतो.
🔹मोबाईलचे ब्लुटूथ आणि जीपीएस ऑफ ठेवल्याने बॅटरी अधिक चालते असे म्हटले जाते. मात्र, हे खरे नसून ते ऑफ ठेवल्याने मोबाईलवर काहीही फरक पडत नाही. जीपीएस आणि ब्लुटूथ ऑफ ठेवावे कारण यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा सेफ राहतो.